Thane Crime : नातेवाईकाकडून सतत होणाऱ्या लैंगिक अत्याचारास कंटाळून तरुणीची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Crime : नातेवाईकाकडून सतत होणाऱ्या लैंगिक अत्याचारास कंटाळून तरुणीची आत्महत्या

Thane Crime : नातेवाईकाकडून सतत होणाऱ्या लैंगिक अत्याचारास कंटाळून तरुणीची आत्महत्या

Updated Apr 09, 2023 11:47 PM IST

Thane news : ठाण्यात एका तरुणीने लैंगिक छळास कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटनाडायघर भागातघडली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

ठाणे – ठाण्यात एका तरुणीने लैंगिक छळास कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना डायघर भागात घडली आहे. येथे नातेवाईकांच्या घरी शिक्षणासाठी बिहारमधून आलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर नातेवाईकाने अत्याचार केल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. पीडितेच्या चुलत आत्याच्या दिराकडून तिचा शारीरिक छळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पीडित तरुणीमूळची बिहार राज्यातील असून घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे तिच्या वडिलांनी तिला शिक्षणासाठी चुलत आत्याच्या घरी पाठविले होते. शिक्षणानिमित्त ही मुलगी मागील काही महिन्यांपासून डायघर भागात वास्तव्यास होती.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आत्याचा दीर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून तिने याची तक्रार वडिलांकडे केली होती. तिचे वडील येऊन तिला परत बिहारला घेऊन जाणार होता. मात्र यापूर्वीत तिने टोकाचे पाऊल उचलले.

 

तिच्या आत्महत्येची माहिती वडिलांना मिळताच त्यांनी डायघर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर