मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli Crime News : क्षुल्लक वादातून तरुणाचं गुप्तांग छाटलं; धक्कादायक घटनेनं डोंबिवलीत खळबळ

Dombivli Crime News : क्षुल्लक वादातून तरुणाचं गुप्तांग छाटलं; धक्कादायक घटनेनं डोंबिवलीत खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 01:40 PM IST

Dombivli Crime News Today : एकाच कंपनीत काम करत असलेल्या तरुणांनी सोबत बसून मद्यपान केलं. परंतु मध्यरात्री आरोपीनं तरुणाचं लिंग छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dombivli Mumbai Crime News Marathi
Dombivli Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Dombivli Mumbai Crime News Marathi : किरकोळ वादातून डोंबिवलीत एका कामगार तरुणावर आरोपींनी धारदार शस्त्रानं वार करत त्याचं लिंग छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून जखमी तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तरुणावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपी आणि तरुण एकाच कंपनीत काम करत असल्यामुळं त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. त्याच वादातून आरोपीनं तरुणाचं लिंग कापल्यानं डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजयकुमार मुन्सीराम राम याच्यासह सुरेंद्र रमेश राम, आश्रय राम आणि सोनुकुमार राम हे तरुण डोंबिवलीलगत असलेल्या गोळवली एमआयडीसीमध्ये एकत्र काम करत होते. संध्याकाळी काम संपल्यानंतर सर्वांनी रात्री सोबत जेवण करून दारू पिण्याचा प्लॅन आखला. त्यावेळी सर्वांनी एकत्र चिअर्स करत मद्यप्राशन केलं. परंतु काही दिवसांपूर्वी संजय याच्याशी वाद झाल्यामुळं आश्रय, सुरेंद्र आणि सोनुकुमार यांचे संजयशी वाद झालेले असल्यामुळं त्यांनी त्याला मध्यरात्री ठार मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी सोनुकुमारनं बाहेरून धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडची व्यवस्था केली.

त्यानंतर सर्व आरोपींनी संजयकुमारला घट्ट पकडलं आणि सोनुकुमारनं धारदार शस्त्रानं त्याचं गुप्तांग छाटलं. याशिवा त्याच्या पाठिवर आणि मानेवरही लोखंडी रॉडनं आरोपींनी वार केले. परिणामी घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव झाल्यानं आरोपींनी संजयला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून संजयवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करून पोलिसांनी जेजे रुग्णालयात जाऊन जखमी संजयची भेट घेतली. त्यानंतर संजयनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point