रायगडावर रविवारी ढगफुटी सदृष्य पाऊस कोसळला होता. यावेळी रायगडाच्या मुख्य दरवाजातून पाणी वाहत होते तसेच वरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले होते. त्याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर हा तरुण मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच वेगवान पाण्यामुळे तो वाहून गेला होताया तरुणाचा मृतदेह आता४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे.
रविवारी (७ जून) रोजी रायगड किल्ल्यावर ढगफुटी झाली होती. यावेळी मनोज खोपकर हा तरुण धबधब्याच्या पाण्यातून वाहून गेला आहे. यामुळे रायगडमध्ये खळबळ माजली असून दिवसांपासून एनडीआरएफचे पथक, सिस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत शोधमोहीम सुरू होती. रायगड किल्ल्यापासून ते बाणकोट खाडीपर्यंत मनोज खोपकर याचा शोध घेतला जात होता. अखेर दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्या सुमारास वाघेरी गाव हद्दीतील काळ नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी रात्री त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायगडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झाली होती. यावेळी रायगडाच्या पायऱ्यावर धबधब्यासारखे पाणी वाहत होते. यामुळे पर्यटक काही काळ अडकून पडले होते. त्यावेळी रायगडवाडी गावातील मनोज खोपकर हा तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरलेला होता. मात्र गडावरून अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला होता. पोलीस, एनडीआरएफसह इतर बचाव दलाकडून त्याचा शोध घेतला जात होता.
मनोज मुंबईत कामाला होता व मुंबईतील आपल्या मित्रांसह गावी आला होता. रविवारी तो मित्रांसह धबधब्यातील पाण्यात पोहायला गेला होता. मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत तो वाहून गेला होता. एनडीआरएफच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता. चार दिवसानंतर त्या मृतदेह आढळून आला. त्यामुळे शोधमोहीम आता थांबवण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी रायगड किल्ला व परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. यात पहिल्यांदाच रायगडाच्या महाद्वारातून पाणी बाहेर पडले. या अतिवृष्टीनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. ३१ जुलैपर्यंत रायगड पर्यटकांसाठी बंद असणार आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग टाकून बंद करण्यात आला आहे. येथे पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.