मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Crime : क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या तरूणानं कृष्णा नदीत उडी मारून संपवलं जीवन

Sangli Crime : क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या तरूणानं कृष्णा नदीत उडी मारून संपवलं जीवन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 08, 2024 06:41 AM IST

Sangali Crime : सांगलीत क्लासला जातो म्हणून एका तरुणाने कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Sangali Crime
Sangali Crime

Sangali Pune Crime : सांगलीत क्लासला जातो म्हणून १८ वर्षाच्या तरुणाने कृष्णा नदीत उडी मारून जीवन संपवले आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अस्पष्ट आहे. आर्यन जितेंद्र माने (वय १८, रा. विश्रामबाग, सांगली) असे तरुणाचे नाव आहे.

NCP Crisis : पुण्यात राजकारण तापलं; राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील ‘घड्याळ’ हटवलं, नेत्याला अश्रू अनावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन हा सांगलीतील विश्रामबाग येथील गर्व्हेमेंट कॉलनीमध्ये राहण्यास आहे. रविवारी (दि ४) तो दुपारी क्लासला जातो या कारणाने घराबाहेर पडला. मात्र, बराच वेळ होऊन तो घरी परतला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी आर्यन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा शोध सुरू असतांना कृष्णा नदीवरील बंधार्‍याजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे त्याने कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला. दरम्यान, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.

पुण्यात चुलती पुटण्याची आत्महत्या

पुण्यामध्ये देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलती आणि पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरुर तालुक्यात गणेगाव दुमाला येथे घडली. कल्पना रवींद्र शिंदे (३१ वय) आणि सचिन दौलत शिंदे (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या चुलती आणि पुतण्याची नावे आहेत. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

WhatsApp channel