Chikhali News : गाढ झोपेत असताना साप चावला; चार तासांतच तरुणाचा मृत्यू; बुलढाण्यातील घटनेनं शोककळा
Buldhana News : सर्पदंश झाल्यानं घरात झोपलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं बुलढाण्यात शोककळा पसरली आहे.
Chikhali Buldhana News Today : सापानं चावा घेतल्यामुळं घरात झोपलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या किन्ही-नाईक या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळं चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून महादेव डाकोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. सापानं त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला होता. झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या हातातून रक्त निघत असल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्याना तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं चिखलीतील डाकोरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव डाकोरे हे त्यांच्या कुटुंबियासह चिखली तालुक्यातील किन्ही-नाईक शिवारातील शेतात राहत होते. रात्री पाणी भरून आल्यानंतर महादेव हे घरातील दरवाज्यापाशी झोपले होते. पहाटेच्या सुमारास त्यांच्या डाव्या हाताला सर्पदंश झाला. परंतु झोपेत असल्यामुळं त्यांना साप चावल्याचं समजलं नाही. झोपेतून उठल्यानंतर हातातून रक्त निघत असल्यामुळं त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर शेतातील नागरिकांसह गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
साप चावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उपस्थितांनी महादेव डाकोरेंना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महादेव यांना साप चावून चार तासांहून अधिकचा कालावधी उलटला होता. महादेव यांच्या मृत्यूची बातमी समजताच डोकोरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.