मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhandara Crime News : जोडप्याने लॉजवर रात्र घालवली, झोपेतून उठताच अवस्था पाहून प्रेयसी हादरली

Bhandara Crime News : जोडप्याने लॉजवर रात्र घालवली, झोपेतून उठताच अवस्था पाहून प्रेयसी हादरली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 22, 2023 12:04 PM IST

Bhandara Crime News : दिवसभर सोबत फिरून आल्यानंतर जोडप्याने रात्रभर लॉजमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सकाळी हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

Bhandara Crime News Marathi
Bhandara Crime News Marathi (HT_PRINT)

Bhandara Crime News Marathi : नागपुरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका लॉजमध्ये तरुणीसोबत रात्र घालवलेल्या एका तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. त्यामुळं भंडारा शहरात खळबळ उडाली आहे. कृष्णा धनजोडे असं मृत तरुणाचं नाव असून तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लॉजवर थांबला होता. भंडारा शहरातील एसटी बस स्टँडसमोर असलेल्या हिरणवार लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळं आता भंडारा जिल्ह्यासह नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुण कृष्णा हा नागपुरातील कामठी तालुक्यातला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कृष्णा धनजोडे या तरुणाचं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यामुळं १९ ऑगस्ट रोजी दोघे एकमेकांना भेटण्यासाठी भंडाऱ्यात आले होते. दिवसभर शहरातील विविध ठिकाणी फिरल्यानंतर दोघांनी शहरातील हिरणवार लॉजमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं दोघांनी हिरणवार लॉजमध्ये रात्र काढली. परंतु सकाळी तरुणीने कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काहीच हालचाल करत नसल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. त्यानंतर तरुणीने या घटनेची माहिती लॉजमधील कर्मचाऱ्यांना दिली. याशिवाय या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

लॉजमध्ये असलेल्या कृष्णा याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. कृष्णाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु पोलिसांनी कृष्णाच्या खोलीतून सेक्सपॉवर वाढवणाऱ्या गोळ्या जप्त केल्याची माहिती आहे. त्यामुळं व्हायग्राचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळंच कृष्णाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोर्स्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याच्या मृत्यूचा खुलासा होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsApp channel