मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंढरपूर : हेडफोन कानात घालून रूळ ओलांडणे बेतलं तरुणाच्या जीवावर, रेल्वेच्या धडकेत मृत्यू

पंढरपूर : हेडफोन कानात घालून रूळ ओलांडणे बेतलं तरुणाच्या जीवावर, रेल्वेच्या धडकेत मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 28, 2023 08:28 PM IST

पंढरपूरमध्ये रेल्वेची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. मंगळवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कानात हेडफोनवर गाणी ऐकत रस्त्याने चालण्याचे तरुणाईत फॅड आले आहे. मात्र हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे तरुणाच्या जीवावर बेतलं. पंढरपूरमध्ये रेल्वेची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी पचंनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मंगळवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. जयेश जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ हा अपघात झाला.जयेश  रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाला रेल्वेची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणाचे दोन्ही पाय तुटून इतरत्र पडले होते. मोबाईलला हेडफोन लावून जाताना रेल्वे हॉर्नचा आवाज न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी मोबाईल आणि हेडफोन आढळून आला आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. तर अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

लिंगाणा किल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू -

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणार लिंगाणा किल्ला हा पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. हा सुळका सर करण्यासाठी देशातून पर्यटक आणि गिर्यारोहक या ठिकाणी येत असतात. असाच एक ट्रेकर्सचा ग्रुप  मुंबईहून आला असताना या ग्रुपमधील एक परीतकाचा  खोल दरीत पडून मृत्यू झाला. 

अजय काळे (वय ६२) असे दरीत कोसळून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. हा पर्यटक सुमारे ४०० फुट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे. पनवेल येथील एक ट्रेकरचा ग्रुप ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्यावर आला होता. अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले.  कांबळे हे  तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळले. दरम्यान त्यांच्या ग्रुपमधील काहीनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दरी खोल असल्याने त्यांचा शोध घेण्यास उशीर झाला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

IPL_Entry_Point