“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Jan 05, 2025 12:05 PM IST

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड येथे सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून एका युवकाने आत्मतहत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
“पत्नीकडे अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत”.., मुलांनो जे मिळेल ते खा! पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड येथे एका सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून एका युवकाणे आत्मतहत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी या व्यक्तिने सुसाइड नोट लिहिली असून त्यात त्याने त्याची व्यथा मांडली आहे. राजू नारायण राजभर (वय ३९) असे या व्यक्तीचे नाव आहे.

काय लिहिलं आहे सुसाइड नोटमध्ये ?

राजू नारायण राजभर यांनी सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी राजभर यांनी सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहिलं की, 'माझ्या पत्नीकडे माझ्या अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत. माझा अंतिम संस्कार शवदाहिनीत करा. गणेश व श्रावणी दोघे सोबत व एकत्र मिळून रहा. गणेश आपल्या छोटीला सांभाळ. मम्मीला त्रास देऊ नका आणि घरात जे बनवतील तेच खा…असे राजभर याने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. यानंतर राजभरने गळफास घेऊन जिवन संपवलं आहे.

राजभर यांनी सावकाराला कंटाळून त्यांचं जिवन संपवलं आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आरोपीवर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. राजू कुमार, रजनी सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर आणखी दोघे फरार आहेत. या दोघांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. आत्महत्यापूर्वी राजू नारायण राजभर यांनी व्हिडिओ देखील काढला असून त्यात त्यांनी आरोपींची नावे घेतली असल्याची माहिती आहे.

काय आहे घटना ?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू राजभर यांनी कुमार राजू, रजनी सिंग, महादेव फुले व हनुमंता गुंडे यांच्याकडून १० टक्के व्याज दराने पैसे उसने घेतले होते. हे पैसे त्यांनी परत करून देखील राजू यांच्याकडे आरोपी हे व्याजाच्या पैशासाठी मागे लागले होते. या चौघांचे पैसे देण्यासाठी राजू यांनी बँकेतून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, बँक व फायनान्स चे पैसे देऊ न शकल्याने त्यांचा देखील कर्जवसूलीचा तगादा राजभर यांच्या मागे लावला होता. एवढेच नाही तर त्यांना मारण्याचे फोन देखील येत होते. राजभर यांनी वरील चौघांचे पैसे देऊन सुद्धा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात होती. तर त्यांच्या मुलांचे अपहरण करू असे देखली त्यांना धमकावले जात होते. पैसे फेडण्याच्या नादात राजू हे त्यात आणखी अडकत गेले. शेवटी त्यांना त्रास सहन न झाल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलत जिवन संपवलं आहे.

व्हिडिओ काढत सांगितली व्यथा

आत्महत्येपूर्वी राजू यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. तसेच एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी “मी माझं जिवन संपवत असल्याचं लिहिलं आहे. माझ्या बायकोने मला साथ दिली असून त्यांची क्षमा राजभर यांनी सुसाइड नोटमध्ये मागीतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र सावकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर