Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

Viral Video : गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

Published Oct 08, 2024 10:35 AM IST

Pune Dandiya Viral Video : पुण्यातील चाकण येथे मुलासोबत गरबा खेळत असतांना एका व्यक्तीचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना
गरबा किंगला दांडिया खेळताना हार्टअटॅक! मुलासमोरच झाला मृत्यू; पुण्याच्या चाकणमधील घटना

Pune Dandiya Viral Video : सध्या संपूर्ण देशात नवरात्रोस्तवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र दांडिया खेळण्याची धामधूम सुरू आहे. ठीक ठिकाणी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून अनेक तरुण तरुणी या ठिकाणी गरबा खेळत आहेत. मात्र, पुण्यातील चाकण येथे गरबा खेळतांना एका कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. गरबा किंग म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तिची मुलासोबत गरबा खेळत असतांना हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या व्यक्तीच्या अशा मृत्यूमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यात प्रसिद्ध गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक माळी हे पुण्यातील चाकण येथे त्यांच्या मुलासोबत गरबा खेळत होते. यावेळी अचानक त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले. यानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू झाला आहे.

अशोक माळी हे त्यांच्या मुलासोबत गरबा खेळत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. सर्व जण दोघंही बाप लेकाचं नृत्य पाहत होते. तसेच तरुण व तरुणी यावेळी त्यांचा व्हिडिओ देखील मोबाइलमधे काढत होते. अशोक माळी हे “घूंघट में चाँद होगा आँचल में चाँदनी” या गाण्यावर गरबा नृत्य करत असतांना अचानक भोवळ आली. त्यांचा नृत्य करण्याचा वेग कमी झाला आणि ते अचानक गुडघ्यावर खाली बसले. यावेळी अचानक लोकांनी त्यांच्या कडे धाव घेतली. त्यांचा मुलगा देखील त्यांच्या जवळ आला. नागरिकांनी त्यांना दवाखान्यात नेलं. पण, तोवर उशीर झाला होता.

गरबा प्रशिक म्हणून अशोक माळी यांची ओळख

अशोक माळी हे गरबा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. गेल्या चार- पाच वर्षापासून ते गरबा प्रशिक्षक देण्याचे काम करत होते. त्यांना नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून बोलवल्या जात होतं. चाकणमधील एका ठिकाणी त्यांना गरबा खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या मुलगा भावेश देखील त्यांनकया सोबत होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर