मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! पाच लाखांची सुपारी देऊन आईनं काढला पोटच्या मुलाचा काटा, कारण ऐकून अवाक् व्हाल!

Yavatmal Crime : यवतमाळ हादरले! पाच लाखांची सुपारी देऊन आईनं काढला पोटच्या मुलाचा काटा, कारण ऐकून अवाक् व्हाल!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 11:50 AM IST

Yavatmal Murder News : मुलाच्या व्यसनाधीनतेला कंटाळलेल्या एका आईने आपल्या मुलाची पाच लाख रुपयांची खंडणी देऊन खून केल्याने खळबळ उडाली आहे.

Yavatmal Crime
Yavatmal Crime (HT_PRINT)

यवतमाळ : व्यसनाधीन असलेल्या मुलाला त्यापासून परावृत करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही सुधरत नसलेल्या मुलाचा अखेर आईनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना चौसाळा जंगल परिसरात घडली. या प्रकरणी दोन महिला सह चार जणांना बेड्या ठोकल्या.

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पाऊस; उकाड्यापासून मिळाला दिलासा, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश विजय देशमुख (वय २५) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी आई वंदना देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी ‌त्याचा मुलगा लखन चौधरी यांना तर सुपारी घेऊन हत्या करणारे विकी भगत आणि राहुल पठाडे यांना या प्रकरणी लोहारा पोलिसांनी अटक केली आहे.

Tillu Tajpuria Murder: तिहार जेलमध्ये पुन्हा टोळीयुद्ध, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची कारागृहात हत्या

योगेश देशमुख याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो त्याच्या आईचा छळ करत होता. त्याला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, तरी सुद्धा तो त्यांच्या आईला खूप त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून आपल्या नतेवाईकांसोबत कट रचून आईनेच पाच लाख रुपये देऊन आपल्या मुलाची हत्या केली. खून करण्यासाठी आरोपींना तिने २ हजार रुपये अॅडव्हान्स दिले.

यानंतर आरोपींनी योगेश याला चौसाळा जंगल परिसरात नेऊन योगेशचा गळा आवळून खून केला. गळा अवळूनही त्याचा मृत्यू होत नसल्याने त्याच्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह त्यांनी तसाच जंगलात सोडून दिला. तब्बल १२ दिवस त्याचा मृतदेह जंगलात पडून कुजला होता. दरम्यान, आरोपींना पैसे न मिळाल्याने त्यांनीच पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर फोन करून याची माहिती दिली.

दरम्यान, लोहारा पोलिस यांनी या फोनची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी गेले योगेशचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. दोघा आरोपींना त्यांनी अटक करून थेट आरोपी आई पर्यंत पोलिस पोहचले. या बाबत आईची चौकशी केल्यावर आईने सुपारी देऊन खून केल्याचे कबूल केले.

WhatsApp channel