Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन मेहुण्यांना संपवलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन मेहुण्यांना संपवलं!

Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! चारित्र्यावरील संशयातून नवऱ्यानं बायकोसह सासरा व दोन मेहुण्यांना संपवलं!

Updated Dec 20, 2023 09:58 AM IST

Yavatmal murder news : यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील कळंब तालुक्यातिल तिरझडा पारधी बेड्यावर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, सासरा, आणि दोन मेहुण्यांचा खून करण्यात आला आहे.

husband murderd wife
husband murderd wife

Yavatmal Kalamb taluka murder news : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा हादरला. पत्नीच्या चारित्र्यावर संशयाने जावयाने धारदार शस्त्राने पत्नी, दोन मेहुणे आणि सासऱ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. जावयाने सासूवर देखील हल्ला केला असून यात सासू गंभीर जखमी झाले आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! २०२४ ची अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास कोर्टाची बंदी

गोविंद विरचंद पवार असे आरोपी जावयाचे नाव आहे. तर पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसाळे, मेहुणा ज्ञानेश्वर भोसले आणि सुनील भोसले असे खून झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्या येथे गोविंद पवार हा त्याच्या पत्नी सोबत राहत होता. दरम्यान, तो पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यामुळे डोंघात मोठे वाद होत होते. गोविंद हा पत्नी रेखाला मारहाण करत होता. रेखा गोविंदच्या मारहाणीला कंटाळून तिच्या माहेरी निघून गेली होती.

QR Code On Hoarding : राज्यात बेकायदा होर्डिंग्जला बसणार चाप! क्यूआर कोड निर्देशांच्या अंमलबजावणीचे कोर्टाचे आदेश

दरम्यान, तिने पुन्हा घरी यावे या साठी गोविंद सासरच्यां सोबत वाद घालत होता. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास गोविंद हा पत्नी रेखा हीच्या माहेरी गेला. या ठिकाणी वाद झाल्याने त्याने रागाच्या भारत सोबत आणलेल्या धार धार शस्त्राने शस्त्राने हल्ला केला. यात पत्नी, दोन महुणे आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सासू रुखमा घोसले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आले असून त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेमुळे मात्र, संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर