मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Inverter Battery Explosion: यवतमाळमध्ये चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट, मेकॅनिक ठार

Yavatmal Inverter Battery Explosion: यवतमाळमध्ये चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट, मेकॅनिक ठार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 29, 2024 06:46 AM IST

Yavatmal Mechanic Killed In Inverter Battery Blast: यवतमाळच्या आर्णी शहरात इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने मॅकेनिकला आपला जीव गमवावा लागला आहे.

यवतमाळमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने मॅकेनिकचा मृत्यू झाला.
यवतमाळमध्ये दुरूस्तीसाठी आलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने मॅकेनिकचा मृत्यू झाला.

Yavatmal Inverter Battery Blast News: यवतमाळमध्ये चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने मॅकेनिक जागीच ठार झाला आहे. ही घटना आर्णी शहरातील माहूर चौकात गुरुवारी (२८ मार्च २०२४) पहाटेच्या सुमारास घडली. बॅटरीचा स्फोट इतका भीषण होता की, मॅकेनिक काही फूट अंतरापर्यंत फेकला गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Malaad suicide news : मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळं अल्पवयीन मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, तस्किल शेख वकील (वय, ३५) असे इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोटात ठार झालेल्या मॅकेनिकचे नाव आहे. तस्किल हा गेल्या अनेक वर्षांपासून इन्व्हर्टर बॅटरी दुरूस्तीचे काम करीत होता. रमजान महिना असल्याने तस्कीलने रोजा ठेवला होता. यामुळे गुरुवारी पहाटे तीन वाजता रोजा सोडण्यासाठी उठला. त्यानंतर दुरूस्तीसाठी आलेली इन्व्हर्टर बॅटरी बनवण्यासाठी माहूर येथील दुकानाकडे निघाला. मात्र, दुकान उघडताच काही क्षणातच इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात तस्किल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे त्यांना मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज नेमका कशाचा आहे, हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांना तस्किल जखमी अवस्थेत जमीनीवर पडल्याचे दिसला. यानंतर त्यांनी त्वरीत स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तस्किलला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने तस्किलचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने आर्णी शहरात एकच खळबळ माजली.

IPL_Entry_Point

विभाग