Meera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Meera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Meera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Updated Mar 07, 2024 07:49 PM IST

Yavatmal Fraudster Meera Phadnis Arrested: भारत सरकारच्या योजनांचे प्रलोभन देऊन सहा जणांची तब्बल ४७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळची मगाठग मीरा फडणीसला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Jail (Representative Image)
Jail (Representative Image)

Meera Phadnis Arrested: अमरावतीची महाठग मीरा प्रकाश फडणीस हिला अटक करण्यात अखेर यवतमाळ पोलिसांना (Yavatmal Police) यश आले. भारत सरकारच्या पर्यटन विभागातील विविध योजनांमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याचे प्रलोभन देऊन सहा जणांची तब्बल ४७ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट २०२३ गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिरूध्द आनंदकुमार होशींगला अटक करण्यात आल्यापासून मीरा फडणीस पसार होती.

याप्रकरणी सचिन अनील धकाते यांनी पोलीस ठाण्यात मीरा फडणीस यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. धकातेंचा मंगल कार्यालय आणि चित्रपट निमिर्तीचा व्यवसाय आहे. मीराने धकाते यांना आपली पर्यटन मंत्रालयाच्या निर्देश सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याचे सांगितले. तसेच पर्यटन मंत्रालयाच्या खूप चांगल्या योजना आहेत, यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचे असल्याचे म्हटले. अशाप्रकारे मीराने अनिरुद्ध होशिंग याच्या मदतीने सहा जणांची ४७ लाखांनी फसवणूक केली.

अवधुतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध होशींग आणि मीरा फडणीस यांच्याविरुद्ध फिर्याद मिळताच पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी होशींगला बेड्या ठोकल्या. तर, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मीरालाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी करीत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर