मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Crime : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून यवतमाळमध्ये जोडप्यास मारहाण, एकाचा डोळा फुटला!

Yavatmal Crime : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून यवतमाळमध्ये जोडप्यास मारहाण, एकाचा डोळा फुटला!

Jun 18, 2024 12:55 PM IST

Yavatmal Crime : पुरोगामी राज्याला लाजवणारी एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका दाम्पत्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचे पुढे आले आहे.

पुरोगामी राज्यात चाललयं काय? जादूटोण्यामुळे  मूल बाळ होत नसल्याच्या संशयावरून यवतमाळमध्ये जोडप्यास मारहाण
पुरोगामी राज्यात चाललयं काय? जादूटोण्यामुळे मूल बाळ होत नसल्याच्या संशयावरून यवतमाळमध्ये जोडप्यास मारहाण

Yavatmal Crime : पुरोगामी राज्याला लाजवणारी एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. जादूटोणा केल्यामुळे गावातील काही जणांना मूलबाळ होत नसल्याच्या संशयावरून एका दाम्पत्याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचे पुढे आले आहे. या घटनेत मारहाण झालेल्या एकाचा डोळा फुटला आहे. तर त्याची पत्नी देखील गंभीर जखमी झाली आहे. जखमी दाम्पत्याला नागपूरच्या शासकीय दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील यावली गावात प्रमोद वाकोडे हे त्यांच्या पत्नीसोबत राहतात. दरम्यान, गावातील काही घरातील बायकांना प्रमोद वाकोडे आणि त्यांच्या पत्नीने जादूटोणा केल्याने त्यांना मूलबाळ होत नसल्याचा संशय होता. याच संशयातून गावातील प्रज्वल ठाकरे व आणखी आठ जणांनी प्रमोद वाकोडे यांच्या घरी जाऊन त्यांना अनाई त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत प्रमोद यांचा डोळा फुटला असून तो निकामी होण्याची भीती आहे. तर प्रमोद यांच्या पत्नीला देखील आरोपींनी मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना झाल्यावर प्रमोद यांच्या नातेवाइकांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रकरणी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात आरोपी यांनी जादूटोणा केल्याने मूलबाळ होत नसल्याच्या संशयातून मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार बाभूळगाव पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुरोगामी राज्यात चाललय काय?

महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य ओळखले जाते. मात्र, अंधश्रद्धा, जादूटोणा, अघोरी कृत्यातून अनेक गुन्हे राज्यात वाढले असल्याचे चित्र आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असून देखील त्याचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सोबतच ग्रामीण भागात देखील या बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर