मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal Accident: नवस फेडायला पोहरादेवीला जाताना काळाचा घाला, बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात पाच ठार, ११ जखमी

Yavatmal Accident: नवस फेडायला पोहरादेवीला जाताना काळाचा घाला, बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात पाच ठार, ११ जखमी

Jan 16, 2024 05:27 PM IST

Yavatmal Accident : पोहरादेवी येथे दर्शनाला जात असताना भाविकांच्या वाहनाला बेलगव्हान घाटात झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार झाले.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात मालवाहू वाहनाच्या झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.  घाटातील  लोकनायक बापूजी अणे स्मृती स्थळानजीक हा अपघात झाला. मृत व जखमी पोहरादेवीला जात असताना हा अपघात झाला. 

ट्रेंडिंग न्यूज

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत व जखमी लोक पुसद तालुक्यातील मोहा तांडा,  टोकी तांडा, पांढुरणा, सिंघनवाडी येथील रहिवाशी आहेत. 

मालवाहू वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकून  परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मालवाहू वाहनातून हे लोक  पोहरादेवी येथे नवस फेडायला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर काळावर घाला घातला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.  घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुण्यात कात्रज येथे बसची दुचाकीला धडक! दुचाकीस्वारासह दोघे ठार -

पुण्यात कात्रज येथील खोपडे नगर येथील उतारावर एका भरधाव बसने दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेला एक जण ठार झाला आहे. तर दोन पादचारी देखील जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश चोकला आणि गिरीधारीलाल जाट अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अर्जुन जुजाराम देवासी (वय २३, रा. नेहरुनगर, पिंपरी), प्रवीण प्रजापती (वय २३) हे दोन पादचारी जखमी झाले आहेत. 

टी-२० वर्ल्डकप २०२४