Yavatmal Accident News Today: यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलरचा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ जण जखमी झाली आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याशिवाय, ट्रकमधील ७० शेळ्या देखील दगावल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील उमरी सायखेडा येथे आज मालवाहू आयशर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले. याचबरोबर आयशर ट्रकमधील ७० शेळ्यांचाही मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी अर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच स्थानिकांच्या मदतीने आयशर ट्रकमधील जखमी बकऱ्यांना बाहेर काढले.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कार अपघात चालकाचा मृत्यू झाला आहे. तर, ९ जण जखमी झाले. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूरजवळ हा अपघात झाला. दिलीप बर्वे (वय, ४८) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिलीप बर्वे हे डोंबिवली येथील रहिवासी असल्यााची माहिती समोर येत आहे. तर जखमींमध्ये एका महिलेसह सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.
सुमन बर्वे (वय, ६८), अश्वजीत बर्वे (वय, १३), प्रणव बर्वे (वय, ५), आदेश बर्वे (वय, ३), अनिकेत बर्वे (वय १९), प्रिया बर्वे (वय १८ वर्ष), गौरव बर्वे (वय १७ वर्ष), कियारा बर्वे (वय ६ महिने) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुमन बर्वे यांची प्रकृती चिंताजनक आहे.