यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ३० मे २०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार- मृदगंधा दीक्षित आणि विनायक होगाडे; सामाजिक युवा पुरस्कार - ऋतुजा जेवे आणि आकाश टाले; क्रीडा युवा पुरस्कार - हृतिका श्रीराम आणि ओजस देवतळे; युवा इनोव्हेटर पुरस्कार - पद्मजा राजगुरू आणि सुश्रुत पाटील; पत्रकारिता युवा पुरस्कार - ज्योती वाय एल आणि प्रथमेश पाटील; युवा उद्योजक पुरस्कार - शिवानी सोनवणे आणि जयेश टोपे; रंगमंचिय कलाविष्कार पुरस्कार - कृष्णाई उळेकर, ऋतुजा सोनवणे, तनिवी पालव आणि कल्पेश समेळ यांना जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या