मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar Accident : देव दर्शनासाठी जाताना भीषण अपघातात; ठाण्यातील एकाच कुटुंबातील तिघे ठार, ७ जखमी

Ahmednagar Accident : देव दर्शनासाठी जाताना भीषण अपघातात; ठाण्यातील एकाच कुटुंबातील तिघे ठार, ७ जखमी

Jan 02, 2024 12:36 PM IST

Ahmednagar Daund highway accident : अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावर झालेल्या अपघात भीषण अपघात झाला असून यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

ahmednagar daund highway acciden
ahmednagar daund highway acciden

Ahmednagar Accident : नवीन वर्षानिमित्त कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात असणाऱ्या ठाण्यातील कल्याण येथील एका कुटुंबियावर काळाने घाला घातला. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावर दोन गाड्यांची समोरा समोर धडक झाल्याने झायलो कार मधील तिघे जण ठार झाले. तर सात जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. ही घटना सोमवारी घडली. 

Truck drivers strike: ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात इंधन तुटवडा! संपाचा सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्याला? वाचा!

शेहबाज अजिज शेख (वय ३०), गाझी रउफ शेख (वय १३), लुझेन शोएब शेख (वय १३) असे अपघात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रिजवाना अजिज शेख (वय ५७), रिम शोएब शेख (वय ३२), फायजा शोएब शेख (वय ९), शादिन शोएब शेख (वय ११), सना अब्दुल रौफ शेख (वय ३७), अब्दुल रहीम शेख (वय ८), मदिहा शेहबाज शेख (वय २७) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे सर जण ठाण्यातील कल्याण येथील बैलबाजार येथील रहिवासी आहेत.

भुजबळ कुटुंबीयांना उपरती! जमीन बळकावल्याच्या आरोपानंतर पीडित महिलेला २० वर्षांनी दिली भरपाई

मिळालेल्या माहितीनुसार शेख कुटुंबीय हे बेलवंडी फाटा मार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात होते. या साठी त्यांनी महिंद्रा क्झायलो गाडी केली होती. दरम्यान, त्यांची गाडी ही घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर आली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणारया एका सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात शेहबाज अजिज शेख हे जागीच ठार झाले. तर त्यांची दोन मुले गाझी रउफ शेख, लुझेन शोएब शेख यांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना वाटेत मृत्यू झाल. या अपघातात गाडीतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक नागरिकांना या अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने मदत केली. जखमींना बाहेर कडून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस देखील घटनास्थळी दाखल होत, त्यांनी देखील बचाव कार्य राबवले.

WhatsApp channel