Rajdhani Express : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ..! दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसच्या जेवणात आढळल्या अळ्या-worm found in breakfast and food served by delhi mumbai rajdhani express ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajdhani Express : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ..! दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

Rajdhani Express : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ..! दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

Sep 26, 2024 10:50 PM IST

Worm found in Food : दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सकाळी नाष्ट्यासाठी पोहे मागितले होते. यामध्ये अळ्या आढळल्या. या प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला.

राजधानी एक्सप्रेसच्या जेवणात  आढळल्या अळ्या
राजधानी एक्सप्रेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

Worm found in Rajdhani express Food : दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमधील जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरमसाठ तिकीट दर आकारण्यात येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधील निकृष्ठ जेवणाचा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वे विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  गुरुवारी सकाळी राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलेल्या नाष्टा आणि जेवणात अळ्या मिळाल्या आहेत. या किळसवाण्या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारानंतर प्रवाशांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' अर्थात IRCTC द्वारे भारतीय रेल्वेच्या एक्सप्रेस, मेल, राजधानी तसेच शताब्दी एक्सप्रेसमध्ये जेवण पुरवलं जातं. हे जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याच्या तक्रारी याआधीही करण्यात आल्या आहेत. ताज्या घटनेत आता राजधानी एक्सप्रेसमधील  जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. भरमसाठ तिकीट दर असलेल्या या एक्सप्रेसमध्ये हा  प्रकार घडल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

दिल्लीहून मुंबईकडे चाललेल्या राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांना आज (गुरुवारी) सकाळी पोह्यांचा नाश्ता देण्यात आला होता. या पोह्यांमध्ये अळ्या आढळल्या आहेत. त्याचबरोबर दुपारच्या जेवणातही अळ्या आढळल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. 

 दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सकाळी नाष्ट्यासाठी पोहे मागितले होते. यामध्ये अळ्या आढळल्या. या प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर मागवलेलं जेवणही निकृष्ट दर्जाचं होतं. या किळसवाणा प्रकार समोर येताच प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 

Whats_app_banner
विभाग