Pune university mess food : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांच्या आणि मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत खेळ होत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. येथील जेवणात अळी, झुरळे, प्लास्टीक, केस इत्यादी गोष्टी निघणे हे नेत्याचेच झाले आहे. वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या असून शनिवारी देखील मुलींच्या जेवणात अळ्या आणि केस निघल्याचा प्रकार उघडकीस आला. या नंतर मुलांनी या घटनेचा निषेध केला असून काही काळ आंदोलन देखील केले.
शनिवारी सकाळी मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थ्यांनीच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीट मध्ये केस आढळले. या घटना वारंवार होत असल्याने या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवला आहे. दरम्यान, यावर विद्यापीठ प्रशासन फक्त मेस चालक बदलण्याच्या जुजबी कारवाई करत असून जेवणाचा दर्जा मात्र निकृष्टच राहिला आहे.
या बाबत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती तसेच सदस्य राहुल रासने म्हणाले की, आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढावा. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहिल.
या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठीत केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी अधूनमधून भोजनगृहास भेटी देतात. जेवणाचा दर्जा तपासतात परंतु प्राध्यापकामधून अध्यक्ष वगता इतर किती सदस्य मेसला भेटी देतात हा संशोधनाचा विषय आहे, असे देखील रासने म्हणाले.