Worli Hit and Run : मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहा याचा मास्टरप्लॅन! गुन्हा ड्रायव्हरनं केल्याचा रचणार होता बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli Hit and Run : मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहा याचा मास्टरप्लॅन! गुन्हा ड्रायव्हरनं केल्याचा रचणार होता बनाव

Worli Hit and Run : मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहा याचा मास्टरप्लॅन! गुन्हा ड्रायव्हरनं केल्याचा रचणार होता बनाव

Jul 09, 2024 09:43 AM IST

Worli Hit and Run case update : पुण्याप्रमानेच मुंबईतील वरळी हीट अँड रन प्रकरणी वडील राजेश शहा यांनी मुलगा मिहिर शहाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. हा गुन्हा ड्रायव्हरने केल्याचा बनाव शहा रचणार असल्याचं पुढं आलं आहे. तसेच अपघातग्रस्त गाडी देखील नष्ट केली जाणार होती.

मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा मास्टर प्लॅन! गुन्हा ड्रायव्हरनं केल्याचा रचणार होता बनाव
मुलाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा मास्टर प्लॅन! गुन्हा ड्रायव्हरनं केल्याचा रचणार होता बनाव

Worli Hit and Run case update : पुण्यातील कल्याणी नगर येथील हीट अँड रन प्रकरणात बिल्डर अगरवाल यांनी मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरवरला गुन्हा स्व:तावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच मुलाच्या  रक्ताचे नमुने देखील बदलले होते. या घटनेप्रमानेच मुंबईतील वरळी येथील हीट अँड रन प्रकरणात राजेश शहा यांनी मुलगा मिहिर शहाला वाचवण्यासाठी योजना आखली होती. तसेच हा गुन्हा ड्रायव्हरने केला असा बनाव देखील रचला जाणार होता. राजेश यांनी गाडीवरील धनुष्यबाण हे चिन्ह देखील काढून टाकले होते. तसेच त्याला पळून जण्याचा सल्ला देखील शहा कुटुंबीयांनी दिला असल्याचं पोलिसांच्या तपासात पुढं आलं आहे.

वरळी हिट अँण्ड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांना न्यायायल्याने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. राजेश शहा यांनी पुण्यातील घटनेप्रमानेच मुलगा मिहिर शहा याला वाचवण्यासाठी योजना आखल्याचे पुढे आले आहे. संपूर्ण शहा कुटुंबीयांनी मिहीरला पळून जाण्यास सांगितले. तसेच त्याने केलेला गुन्हा हा ड्रायव्हरने केला असे सांगू असे देखील मिहिरला सांगून त्याला पळून जाण्यास मदत केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यावर याची माहिती मिहीरने फोन वरून वडील राजेश शहा यांना दिली. दरम्यान, राजेश शहा यांनी मुलाला वाचवण्यासाठी मिहीरला पळून जा असे सांगितले. यानंतर शहा यांनी अपघातग्रस्त गाडीची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करायचा होता. अपघात झाल्यावर मिहीर शहा व चालक राजऋषी बिडावत हे फरार झाले होते. मात्र, त्यांची गाडी ही वांद्रे कलानगर येथे बंद पडल्याने त्यांनी राजेश शहा यांना याची माहिती दिली.

यावेळी राजेश शहा यांनी ड्रायव्हर बिडावतला अपघात त्याने केला असे पोलिसांना सांगण्यास सांगितले. स्वत: राजेश शहा हे कलानगर येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी अपघातग्रस्त गाडी ही टोईंग व्हॅनने दुसऱ्या ठिकाणी नेन्यासाठी प्रयत्न केले. गाडीवरची नंबर प्लेट देखील त्यांनी काढून टाकली. तसेच गडीवरील शिवसेना पक्षाचे चिन्ह देखील त्यांनी काढून टाकले. टोइंग व्हॅन पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी गाडी शोधल्याने शहा यांची योजना फसली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत शाह यांनी रचलेल्या कटाची कबुली दिली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर