मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  worli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

worli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 28, 2024 09:22 AM IST

worli girl rape: वरळी येथे एका तरुणीला इन्स्टाग्रामवरील तरूणाशी ओळख महागात पडली आहे. तिला पार्टीला घेऊन जात दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

worli girl rape
worli girl rape

Mumbai worli girl rape : आजकाल सोशल मिडियाचा प्रभाव तरुणाईवर सर्वाधिक आहे. या माध्यमातून अनेक अनोळखी मुलांशी किंवा मुलांशी जवळील वाढवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. अशीच एक सोशल मीडियावरील ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. 

वरळी येथील एका तरुणीने इन्स्टाग्रामवरुन एका मुळाशी ओळख कडून त्याच्याशी मैत्री केली. दरम्यान, दोघेही पार्टीसाठी गेले. या ठिकाणी मद्यपान केल्यावर दारूच्या नशेत असलेल्या तरुणीला तरुणाने त्याच्या बंगल्यावर नेत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Japan Moon Mission : भारतानंतर 'या' देशाने करून दाखवलं! चंद्रावर केले यानाचे सॉफ्ट लॅंडींग

मालाड परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार हृतिक शहा या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इन्स्टाग्रामवरून तरुणीची शहासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्री झाल्याने १३ जानेवारी रोजी रात्री ११ ते १४ जानेवारीच्या पहाटेपर्यंत दोघांनी बारमध्ये दारू पार्टी केली. तरुणी नशेत असल्याचा फायदा घेत त्याने वरळीतील उच्चभ्रू परिसरातील मित्राच्या बंगल्यात तिला नेले. यावेळी ती दारूच्या नशेत असतांना त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात तापमानात होणार मोठी घट

सुरुवातीला तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. दरम्यान, ती कुणाशी बोलत नसल्याने १५ तारखेला तिच्या वडिलांनी तिला विश्वासात घेत तिची चौकशी केली. यानंतर तिच्यावर बेतलेला प्रसंग तिने वडिलांना सांगितला. यामुळे त्यांना धक्का बसला. अखेर यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत आरोपी शहा विरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

यानंतर हा गुन्हा वरळीत घडल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा वरळी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तसेच समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीतून कुणावरही विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

WhatsApp channel