मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Drugs Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५० कोटींचे MD ड्रग्ज जप्त

Drugs Racket : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५० कोटींचे MD ड्रग्ज जप्त

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 04, 2022 01:15 PM IST

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं ही कारवाई केली आहे.

Mumbai Police Raid On Drugs Racket
Mumbai Police Raid On Drugs Racket (HT_PRINT)

Mumbai Police Raid On Drugs Racket : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना सातत्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय मुंबईत ड्रग्ज आणि मौल्यवान वस्तूंची तस्करी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या असतानाच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी सेलनं मोठी कारवाई करत एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात ५० कोटी रुपये इतकी किंमत असून या कारवाईमुळं देशाच्या आर्थिक राजधानीत खळबळ उडाली आहे. या कारवाईत मुंबई पोलिसांनी पाच तस्करांनाही बेड्या ठोकल्या असल्याची माहिती आहे.

एनसीबीनं गेल्या महिन्यापासून देशभरात अंमली पदार्थांच्या निर्मूलनाची मोहिम सुरू केली आहे. त्यात या विभागानं आतापर्यंत देशातील ११ राज्यांमधून ५१ हजार किलो ड्रग्ज जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 'अमृतमहोत्सव साजरा' करण्याची घोषणा केल्यानंतर एनसीबीनंही देशभरात छापे टाकून ७५ हजार किलो ड्रग्ज नष्ट करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर आता मुंबईत या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी पुण्यात सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या गेटजवळ ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली होती. त्यानंतर आता मुंबईत केलेल्या कारवाईमुळं एनसीबी आणि मुंबई पोलीस ड्रग्जविरोधात झीरो टॉलरन्सची रणनिती आखत असल्याचं दिसून येत आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग