चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Dec 17, 2024 08:00 AM IST

Worker dies due to grinder in Mumbai : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. चायनीज पकोडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Worker dies due to grinder in Mumbai : मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण काम करत असतांना त्याचा शर्ट हा ग्राइंडरमध्ये अडकला. या नंतर मशीनने या तरुणाला खेचून घेतले. यामुले त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सुरज नारायण यादव (वय १९) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी फॅक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वरळी येथील नरिमन भाटनगर परिसरातील एका चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीत १४ डिसेंबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सुरज यादव यादव हा वरळी येथील नरीमन भाटनगर येथील एका चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये कामाला होता. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले जात होते. ही फॅक्टरी सचिन कोठेकर (वय ३२) यांच्या मालकीअसून या ठिकाणी सुरज हा गेल्या तीन-चार महिन्यांपासून काम करत होता.

ग्राइंडर तोडून मृतदेह काढला बाहेर

चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये सूरज यादव हा पकोड्याला लागणारे पदार्थ ग्राइंडरमध्ये टाकत होता. यावेळी अचानक त्याचा शर्ट ग्राइंडरमध्ये अडकला. काही क्षणात सुरज हा ग्राइंडरमध्ये ओढला गेला. या घटनेत सुरजचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन विभाग व पोलिसांना देण्यात आली. अग्निशामक दलाचे जवान व पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. ग्राइंडर मशीन तोडून सूरज यादव याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सूरजच्या कुटुंबीयांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार फॅक्टरी मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज यादवला ग्राइंडर चालवण्याचा कोणताही पूर्वानुभव किंवा तांत्रिक ज्ञान नव्हते. या ठिकाणी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना आणि प्रशिक्षण न देता कोठेकर यांनी सुरजला हे काम दिल्याचा आरोप त्याच्या नतेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात स्टॉल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात दिल्ली-जयपूर एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचे काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा हरियाणातील गुरुग्राममधील बिलासपूर चौकात ग्राइंडिंग मशिनखाली पडून मृत्यू झाला होता.

 

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर