मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Chavan: मुंबई-गोवा हायवेचं काम कधी पूर्ण होणार?; शिंदे सरकारनं तारीखच सांगितली!

Ravindra Chavan: मुंबई-गोवा हायवेचं काम कधी पूर्ण होणार?; शिंदे सरकारनं तारीखच सांगितली!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 18, 2022 02:12 PM IST

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व खड्डे तातडीनं बुजवून २०२३ पर्यंत या महामार्गाचं काम पूर्णत्वास नेण्याची घोषणा सार्वजिक बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

mumbai goa highway news today marathi
mumbai goa highway news today marathi (HT)

mumbai goa highway news today marathi : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावर मोठमोठे खड्डे झाल्यानं अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळं या महामार्गाचं काम कधी होणार, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत होता. याशिवाय सध्या पावसाळा सुरू असल्यानंही वाहनचालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती, परंतु आता या महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे.

२०२३ च्या आधी महामार्गाचं काम पूर्ण करू- मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आज विधानसभेत चर्चा झाली असून या चर्चेदरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येत्या गणेशोत्वाआधी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा केली, याशिवाय २०२३ च्या आधी या महामार्गाचं काम पूर्णत्वास नेण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळं आता मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळं गोव्याला पोहचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा चार ते पाच तास जास्त लागत होते, त्यामुळं आता शिंदे सरकारनं या मार्गाचं काम पूर्ण करण्याची घोषणा केल्यानं दहा ते अकरा तासांत मुंबईहून गोव्याला पोहचता येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप...

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आज मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत विधानसभेत चर्चा झाली असता गेल्या अडीच वर्षात या मार्गाचं काहीच काम झालं नाही का?, असा सवाल भाजपच्या आमदारांनी शिवसेनेला केला. याला उत्तर देताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, जर हे असं असेल तर गेल्या १२ वर्षांत या रस्त्याचं काम न होणं हे केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचं अपयश नाही का?, असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या