Viral Video : रिक्षाचालक कशी करतात प्रवाशांची फसवणूक? कसं वाढतं भाडं? पाहा, मुंबई पोलिसांचा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : रिक्षाचालक कशी करतात प्रवाशांची फसवणूक? कसं वाढतं भाडं? पाहा, मुंबई पोलिसांचा व्हिडिओ

Viral Video : रिक्षाचालक कशी करतात प्रवाशांची फसवणूक? कसं वाढतं भाडं? पाहा, मुंबई पोलिसांचा व्हिडिओ

Published Oct 24, 2024 08:54 AM IST

Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video: मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चुकीच्या मीटरद्वारे रिक्षाचालक ग्राहकांची कशी फसवणूक करतात हे सांगण्यात आले आहे.

कसं वाढतं रिक्षाचं भाडं ? फक्त एका तीळएवढा फरक, कशी करतात रिक्षा चालक प्रवाशांची फसवणूक? मुंबई पोलिसांचा पाहा व्हिडिओ
कसं वाढतं रिक्षाचं भाडं ? फक्त एका तीळएवढा फरक, कशी करतात रिक्षा चालक प्रवाशांची फसवणूक? मुंबई पोलिसांचा पाहा व्हिडिओ

Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video: मुजोर रिक्षा चालकांचा प्रताप अनेकांनी सहन केला असेल. कमी अंतरावर चुकीच्या मीटरद्वारे अव्वाच्या सव्वा हे रिक्षा चालक प्रवाशांकडून भाडे वसूल करत असतात. यावरून अनेकदा रिक्षा चालक आणि प्रवाशांचे वाद देखील होत असतात. या बाबत प्रवाशांनी मुंबई वाहतूक शाखेकडे अनेकदा तक्रारी देखील केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसानी एक व्हिडिओ जारी केला आहे. यात रिक्षा चालक कक्ष पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करून जास्तीचे भाडे आकारतात हे दाखवण्यात आलं आहे. हे मीटर कापलेल्या अंतरापेक्षा अधिक रक्कम कशी दाखवतात व कशी फसवणूक केली जाते हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यातं आलं आहे. तसेच सदोष मीटर कसे ओळखावेत याची देखील माहिती देण्यात आली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ एका रिक्षात शूट केला आहे. व्हीडिओतील मीटरला 'घोडा मीटर' म्हटलं आहे. घोडा ज्या वेगाने पळतो त्याच वेगाने रिक्षातील मीटर पळत असल्याने त्याला हे नाव दिले गेले आहे. या व्हिडीओत रिक्षा एका जागी उभी असतांनाही मीटर कसे वेगाने पळते हे दाखवण्यात आले आहे. मीटर वेगाने पळवण्याचे कंट्रोल बटण हे रिक्षाचालकाच्या हॅण्डलमागे असतं. रिक्षा चालक प्रवाशाला कळू न देता हे बटन सुरू करतो आणि मीटर वेगाने पळते. ही बटण बंद केल्यास मीटर पुन्हा सामान्य वेगात चालत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हे बटण सुरु केल्याचं कस ओळखाव हे या व्हिडिओत सांगण्यात आलं आहे. याची एक निशाणी मीटरवर दिसते.

कसे ओळखाल मीतर वेगाने फिरतयं ?

मीटर वेगाने फिरत आहे की नाही हे कसे ओळखावे याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. रिक्षा चालकाने वेगवाने मीटर पळवण्याचं बटण सुरु केलं की मीटरवर शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट ब्लिंक होतो. जर मीटर ८८ रुपये भाडं दाखवत असेल आणि मीटर पळवण्याचं बटण सुरु असेल असेल तर मीटरच्या इंडिकेटवर रक्कम '८८.००.' अशी दिसेल. या शेवटच्या शून्यानंतरचा पॉइंट म्हणजे मीटर वेगाने पळवण्याचं बटन सुरु झाले हे दर्शवतं अशा रिक्षाचालकाची तक्रार आरटीओकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी एक्सवर केला व्हिडिओ शेअर

हा व्हिडीओ मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन पोस्ट केला असून मीटर भाडे कसे वाढते याची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना म्हटले आहे की, "रिक्षाचे भाडे अचानक कसे वाढे? जाणून घ्या एका तीळएवढा फरक, कशाप्रकारे तुमची फसवणूक रिक्षा चालक करतात. तुमच्या नकळतपणे मिटरमध्ये फेरफार करून जास्त शुल्क आकारून फसवणूक केली जाते, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच अशा रिक्षा चालकांपासून सावध राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर