श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे दरवर्षी पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आपल्या धारकऱ्यांसह सामील होत असतात. यावरून वारकरी व धारकऱ्यांमध्ये वादाचे प्रकारही घडले आहेत. यावेळी तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. याची काळजी घ्या, तसेच समाजात तेढ निर्माण करणारी भाषणे, विधाने करू नका, अशी नोटीस पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना बजावली आहे. असे असतानाही संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.
उपस्थित धारकऱ्यांना संबोधित करताना भिडे म्हणाले की, आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्री आणि हांडगं स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. तसेच, वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीही जाऊ नये, महिलांनी साडी परिधान करूनच वटाच्या पूजेला जावे, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुण्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. लाखो वारकरी माऊली - तुकोबांचा जयघोषात पंढरीच्या वाटेवर आहेत. पुण्यात संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत असतात. त्यावरून अनेक वेळा वारकरी आणि धारकरी यांच्यात वादाचे प्रकार घडले आहेत. या वर्षी देखील संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात आले आहेत. त्यापूर्वी संभाजी भिडे यांनी शिवाजीनगर भागातील जंगली महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. येथे असंख्य धारकरीही उपस्थित आहेत.
धारकऱ्यांना संबोधित करताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं असं भिडे म्हणाले.
तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर धारकरी संचेती हॉस्पिटलच्या पुढे पालखी सोहळयात सहभागी होत असतात. यामुळे येथे पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या सोहळ्यासाठी राज्यभरातून धारकरी पुण्यात येत असतात. त्यातच भिडेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या