What Is Japans Naked Man Festival: जपानच्या नेकेड महोत्सवात प्रथमच महिलांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तब्बल १६५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला जपान नेकेड महोत्सवात सहभागी होणार आहेत. हाडाका मात्सुरी या नावाने हा सण ओळखला जातो. हा सण जपानच्या आयची प्रांतातील इनाझावा शहरातील कोनोमिया तीर्थाद्वारे आयोजित केला जाणारा एक पारंपारिक कार्यक्रम आहे. या वर्षी हा कार्यक्रम येत्या २२ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. या कार्यक्रमात १० हजारांपेक्षा अधिक पुरुष सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
यावर्षी, ४० महिलांना नेकेड महोत्सवाच्या काही विधींमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, या महोत्सवात महिलांना पूर्ण कपडे घालण्यास बंधनकारक असेल. महिला पारंपारिक हॅपी कोट घालतील. महिलांना फक्त 'नॉइजासा' विधीमध्ये सहभागी होता येणार आहे, ज्यात त्यांना मंदिराच्या मैदानात कापडात गुंडाळलेले बांबू गवत घेऊन जावे लागेल. स्थानिक महिला आणि समाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.
"कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात आला नाही. या काळात महिलांनाही नेकेड महोत्सवात सहभागी करण्याच्या अनेक विनंत्या आल्या. महिलांना नेकेड महोत्सवात कोणतीही बंदी नव्हती. महिला स्वत:हून उत्सवापासून दूर राहत होत्या", असे आयोजक समितीचे अधिकारी मित्सुगु कातायामा म्हणाले आहेत.
नेकेड महोत्सवा हजारो पुरुष कपडे घालत नाहीत. त्यापैकी काहीजण फंडोशी नावाचा जपानी लंगोट घालतात. महोत्सवाच्या विधींचा एक भाग म्हणून पुरुष मंडळी सुरुवातीचे काही तास मंदिराच्या मैदानाभोवती धावतात आणि थंड पाण्याने अंघोळ करून नंतर मुख्य मंदिराकडे जातात. या मंदिरातील एक पुजारी दोन काठ्या फेकतो, ते शोधण्यासाठी लोक धडपड करतात. पुजारीने फेकलेल्या काठ्या ज्या व्यक्तीला सापडतात, त्यांचे वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जाते, असे मानले आहे. परंतु, या महोत्सवात अनेक पुरुष जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
संबंधित बातम्या