Viral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Viral Video: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...; संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Dec 08, 2024 01:49 PM IST

Clothing Shop Viral Video: कुटुंबासह कपड्याच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडिओ: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...
व्हायरल व्हिडिओ: संपूर्ण कुटुंबच चोर! कपड्याचा दुकानात शिरले अन्...

Viral News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला तिच्या मैत्रिणीसोबत, एका मुलीसोबत कपड्याच्या दुकानातून चतुराईने चोरी जीन्स पँट चोरी करताना दिसत आहे. दुकानदार आपल्या कामात व्यस्त असताना, हे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीमागे चोरी करून दुकानदारातील फसवणूक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखवत असल्याचे दिसून येते. या ग्राहकांमध्ये दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. दुकानदार कपडे काढण्यासाठी मागे वळताच एक महिला दुकानातील जीन्स काढून शेजारी उभ्या असलेल्या महिलेला देते. त्यानंतर ती महिला आपल्या बाजूच्या मुलीला जीन्स देते. यानंतर मुलगी आपल्या टी- शर्टमध्ये लपवते. यानंतर ते सर्वजण दुकानातून निघून जातात. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

be_harami नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत २.१ दशलक्षाहून अधिक वेळा पाहण्यात आले. तर, अनेकांनी व्हिडिओला लाईक केले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'वाह दीदी...मजा आली.' दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, 'संपूर्ण कुटुंब चोर आहे. तर, ती एक महिला आहे आणि महिला काहीही करू शकतात.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर