प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना-women killed husband with help of lover at midnight at karvenagar pune ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना

Sep 21, 2024 05:28 PM IST

Pune karve nagar murder : पुण्यात कर्वेनगर येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकरच्या मदतीने हत्या केली.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच पत्नीने केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच पत्नीने केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना

Pune karvenagar murder : पुण्यात खून, दरोडे, बलात्कार या सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. शनिवारी अशीच एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने मुलींसमोरच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच उघड झालं आहे. यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव रचत पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला. आरोपी पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात श्रीमान सोसायटीत शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल निवंगुणे हे ड्रायवर आहे. ते एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. शुक्रवारी रात्री घरी सर्व जण झोपले होते. यावेळी रात्री १ च्या सुमारास काही लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. यावेळी राहुल निवंगुणे यांनी दरवाजा उघडला तेव्हा काही जण चेहऱ्यावर मास्क लावून त्यांच्या पुढे उभे असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी काही विचारायच्या आत हल्लेखोरांनी राहुल यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. राहुल यांचा आवाज ऐकून त्यांच्या मुली व पत्नी दरवाजाजवळ आल्या. वडिलांवर झालेला हल्ला पाहून मुलींना धक्का बसला. यानंतर हल्लेखोरांनी दागिने व रोकड किंमती वस्तूंची चोरी केली अशी माहिती पत्नीने पोलिसांना दिली. पोलिसांना काही माहिती देण्याच्या अवस्थेत मुली नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी राहुल यांच्या पत्नीची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या जबाबत त्यांना तफावत आढळली. त्यांनी कसून चौकशी केली असता पत्नीनेच राहुल यांची हत्या केली असल्याचं पुढं आलं. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला देखील अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने राहुल यांची हत्या केल्याच कबूल केले.

या पूर्वी देखील केला होता हत्येचा प्रयत्न

राहुल यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. या संबधाची माहिती राहुल यांना मिळाली होती. त्यामुळे ते पत्नीवर नजर ठेऊन होते. याची कुणकुण पत्नीला लागली. त्यामुळे तिने राहुल यांची हत्या करण्याचे ठरवलं होत. तिने प्रियकराच्या मदतीने या पूर्वी देखील राहुल यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो फसला होता.

खून करून घरात दरोडा पडल्याचा रचला बनाव

राहुल यांच्यावर आरोपींनी वार केल्यावर पत्नी व मुली बाहेर आल्या. राहुल यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना संशय आला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी घरातले दागिने, रोख रक्कम, किंमती वस्तू लंपास केल्याचे राहुल यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. मात्र, हा बनाव असल्याच पोलिसांच्या लक्षात आल्याने या गुन्हाची उकल झाली.

Whats_app_banner
विभाग