Nalasopara gang rape case : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुंबईच्या नालासोपारा येथे एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून व तिचे केस आणि तोंड दाबून खोलीत नेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन भागात ही घटना घडली. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यातमहिलेले दिलेल्या तक्रारीनुसार सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र यादव उर्फ काटु, अवी जैसवाल उर्फ बिल्लू अशी आरोपींची नावे आहेत.
३२ वर्षीय पीडित महिला ही नालासोपारा येथे राहते. १० सप्टेंबरला रात्री ९.१५ च्या सुमारास ती मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी जितेंद्र यादव उर्फ काटु याने पीडित महिलेच्या पाठीमागून तिला कळू न देता तिचे केस ओढून तोंड दाबले. यानंतर तिला त्याच अवस्थेत खेचत नेऊन गल्लीतील एका खोलीत असलेल्या अवी जैसवाल उर्फ बिल्लूने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवला.
त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने देखील पीडित महिलेवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. व तिला तेथेच सोडून पळ काढला.
या घटनेनंतर पीडित महिलेने शनिवारी तुळींज पोलीस ठाण्यात जात तिच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या