Thane News : ठाण्यात १६० किलो वजनाची महिला बेडवरून पडली, कुणालाच उचलता येईना, शेवटी...-woman weighing 160 kg falls from bed fire brigade team comes to lift her ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane News : ठाण्यात १६० किलो वजनाची महिला बेडवरून पडली, कुणालाच उचलता येईना, शेवटी...

Thane News : ठाण्यात १६० किलो वजनाची महिला बेडवरून पडली, कुणालाच उचलता येईना, शेवटी...

Sep 07, 2023 04:45 PM IST

Thane Woman falls off bed : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज एका घटनेमुळं आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं काय झालं?

Thane
Thane

Thane Woman falls off bed : तब्बल १६० किलो वजन असलेली एक आजारी महिला बेडवरून खाली पडल्यानं थेट महापालिकेची मदत घ्यावी लागल्याची अजब घटना ठाणे शहरात घडली आहे. महिलेला उचलून पुन्हा बेडवर ठेवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, वाघबीळ भागातील १६० किलो वजनाची एक आजारी महिला गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास चुकून बेडवरून खाली पडली. तिच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा उचलून बेडवर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही केल्या त्यांना ते शक्य झालं नाही. शेवटी त्यांनी महापालिकेची मदत मागितली.

महापालिकेला ही माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) एक पथक फ्लॅटवर पोहोचलं. बेडवरून पडलेल्या महिलेला त्यांनी पुन्हा उचलून बेडवर झोपवलं. तिला कुठलीही दुखापत झालेली नाही.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष मदतीची अनेक कामं केली जातात. मात्र, आजचा प्रकार फारच वेगळा होता. ही महिला ६२ वर्षांची असून अति वजन आणि आजारपणामुळं तिला स्वत:हून हालचाल करता येत नाही, असं तडवी यांनी सांगितलं.

विभाग