गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

Jan 19, 2025 01:26 PM IST

Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करतांना दरीत कोसळल्याने पुण्यातील पर्यटक तरुणीचा व पॅराग्लायडरचा दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरोधात मांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली.  केरी येथील डोंगराळ भागात  झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २६) आणि पायलट  सुमल नेपाळी (वय २६) यांचा मृत्यू झाला.  गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली.

 गोव्याला फिरण्यासाठी पुण्याहून आलेला पर्यटकांचा एक ग्रुप शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास केरी येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी आला होता. येथील ज्या डोंगरावरुन पैराग्लाइडिंग केले जाते त्या ठिकाणी हा ग्रुप पोहोचला. यावेळी शिवानी दाभाळे हिने पायलट सुमन नेपाळी याच्यासह डोंगरावरून उड्डाण केले. थोड्यावेळातच त्यांचे पैराग्लायडर दरीत कोसळले आणि यात दोघांचा मृत्यू झाला. ग्लायडरची दोरी तुटल्याने ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कंपनीवर गुन्हा 

शिवानी दाभाळे यांनी ज्या साहसी क्रीडा कंपनीकडून पॅराग्लायडिंगसाठी बुकिंग केले होते, ती कंपनी बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  उड्डाण करताच पॅराग्लायडर दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरोधात मांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्याची कोठडीत चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी दोन अपघात 

हिमाचल प्रदेशातील कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात २४ तासांत पॅराग्लायडिंगशी संबंधित दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हे पर्यटक गुजरात आणि तामिळनाडूचे असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. धर्मशाळेजवळील इंद्रनाग पॅराग्लायडिंग साइटवर पॅराग्लायडरवर बसलेल्या अहमदाबादच्या भावसार खुशीचा १०० फुटावरून खाली पडून मृत्यू झाला. त्याच्यासोबत पायलटही देखील खाली पडून जखमी झाला. कांगडाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक वीर बहादूर यांनी सांगितले की, पायलटला उपचारासाठी टांडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात आहे. दुसऱ्या एका घटनेत कुल्लू जिल्ह्यातील गारसा लँडिंग साइटजवळ पॅराग्लायडिंग करताना तामिळनाडूतील एका २८ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर वैमानिक गंभीर जखमी झाला.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर