Viral Video: चिकन नीट न शिजवल्यानं सासरच्या लोकांनी सूनेला इमारतीच्या खाली फेकलं, व्हिडिओ व्हायरल-woman thrown off building by in laws allegedly for not spicing chicken properly in pakistan lahore ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: चिकन नीट न शिजवल्यानं सासरच्या लोकांनी सूनेला इमारतीच्या खाली फेकलं, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: चिकन नीट न शिजवल्यानं सासरच्या लोकांनी सूनेला इमारतीच्या खाली फेकलं, व्हिडिओ व्हायरल

Mar 31, 2024 09:00 PM IST

Woman Thrown Off Building Video: पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चीकन नीट शिजवले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी सूनेला इमारतीच्या खाली फेकले.

चिकन नीट शिजवले नाही म्हणून सासरच्या लोकांनी सुनेला इमारतीच्या खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चिकन नीट शिजवले नाही म्हणून सासरच्या लोकांनी सुनेला इमारतीच्या खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Pakistan Lahore Viral Video: पाकिस्तानच्या लाहोरमधून धक्कादायक माहिती समोर आली. चिकन नीट शिजवले नाही म्हणून सासरच्या लोकांनी सूनेला इमारतीच्या खाली फेकले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिला इमारतीवरून पडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरच्या नोनारियन चौकातील शालीमार रोडजवळ ९ मार्च २०२४ रोजी ही घटना घडली. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि तिचा मेहुणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, पीडितेच्या घरातील भांडणाचा आवाज ऐकून एक लहान मुलगी तिच्या घराचा दरवाजा उघडते. त्यानंतर काहीच क्षणात पीडित महिला इमारतीच्या खाली पडते आणि वेदनाने किंचाळते. या व्हिडिओत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.

@DikshaKandpal8 या ट्विटर हँडलवरून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेबाबत माहिती देण्यात आली. "लाहोर पाकिस्तानमधील धक्कादायक घटना! चिकन नीट शिजवले नाही म्हणून एका महिलेला तिचा पती शाहबाज, मेहुणा रोमन आणि सासू शाझिया छतावरून खाली फेकले. घटना ९ मार्च २०२४ ची आहे. मुख्य आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली."

Whats_app_banner
विभाग