Woman Sells Baby For Husbands Bail In Mumbai: तुरुंगात असलेल्या पतीच्या जामीनासाठी पैसे नव्हते म्हणून एका महिलेने पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेसह तिच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्यविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (व्यक्तीची तस्करी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मुलांच्या तस्करी आणि असुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
मनीषा पवार (वय ३२) असे पोटच्या तीन महिन्याच्या बाळाला विकणाऱ्या महिलेचे नाव आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषाचा पतीला रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून तो मुंबईतील भायखळा कारागृहात आहे. पतीला तरुंगातून बाहेर काढण्यासाठी मनीषा अनेक प्रयत्न केले. परंतु, ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने चक्क पोटच्या तीन महिन्यापूर्वी जन्म दिलेल्या बाळाला विकला विकले.
मनीषाची सासू प्रमिला पवार (वय, ५१) यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मनीषाने आपल्या मुलीला एक लाख रुपयांना बेंगळुरूमध्ये विकल्याचा दावा पवार यांनी केला. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता पोलिसांना आढळले की, मनीषाला खरोखरच व्यवहारातून पैसे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी मनीषाला अटक केली. तसेच या गुन्ह्यात सहभागी इतर आठ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात सुलोचना कांबळे (वय, ४५) हिचा समावेश आहे, जिने मनीषाला तिची मुलगी विकण्यात मदत केली. तर, मीरा राजाराम यादव, योगेश सुरेश भोईर, रोझ हनी सोंटू घोष, संध्या अर्जुन राजपूत, मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण, तैनाज शाहीन चौहान आणि मोईनुद्दीन तांबोळी अशी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावे आहेत.
हे प्रकरण एका मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा भाग असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ (व्यक्तीची तस्करी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणामुळे मुलांच्या तस्करी आणि शोषणाच्या असुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली. काही लोक आर्थिक दबावाखाली आपल्या बाळांची विक्री करतात, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.