live 17cm worm found in Woman stomach : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका ४५ वर्षीय महिलेला पोटात तीव्र वेदना होत असल्याने तीने रुग्णालयात धाव घेतली. तीने बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असतांना सर्वांना धक्का बसला. महिलेच्या पित्त नलिकेत तब्बल १७ सेमी आकाराचा जिवंत जंत सापडला. शस्त्रक्रिया करून ही जंताची अळी डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून बाहेर काढली आहे. जंताचा हा प्रकार लहा मुलांमध्ये दिसून येतो. मात्र, आता प्रौढांमध्ये देखील "जिवंत" आढळणे दुर्मिळ आहे.
पीडित महिला ही गेल्या गुरुवारी, गॉल ब्लॅडर स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी काही महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. यावर उपचार घेऊन ती पुन्हा घरी परतली होती. मात्र, तिच्या पोटात वरच्या भागात तीव्र वेदना होत होत्या. यामुळे ही महिला पुन्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहचली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तसेच तिच्यावर आधी झालेल्या शस्त्रक्रियेची देखील तिने माहिती घेतली. डॉक्टरांना तिच्याशी संबंधित काही त्रास असू शकतो अशी शंका आली. त्या दृष्टीने तिची तपासणी करण्यात आली.
रुग्णावर उपचार करणारे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. गजानन रॉडगे यांनी सांगितले की, महिलेच्या सर्व तपासण्या या सामान्य आल्या. तिच्या पित्ताशयाची देखील तपासणी करण्यात आली. त्यातही काही न आढळल्याने डॉक्टरांनी महिलेची एंडोस्कोपी केली. यात पित्त नलिकेत पांढऱ्या नळीच्या आकाराचे त्यांना काही तरी हलतांना दिसले. हा जंताचा प्रकार असल्याचे डॉक्टरांना कळले. यानंतर या महिलेवर शस्त्रक्रिया करून तब्बल १७ सेमी आकाराची ही जंताची अळी काढून टाकण्यात आली.
डॉ. रॉज म्हणाले की, Ascaris Lumbricoides हा सर्वात सामान्य परजीवी जंतांपैकी एक आहे, हा जंत दरवर्षी अंदाजे एक अब्ज लोकांना प्रभावित करतो. "तथापि, पित्त नलिकेच्या आत जिवंत शोधणे असामान्य बाब असल्याचे रॉज म्हणाले. न शिजवलेले अन्न किंवा दूषित पाणी प्यायल्याने हा जंत या महिलेच्या पोटात गेला असू शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. सध्या या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला जंतनाशक औषधे लिहून देण्यात आहेत.
संबंधित बातम्या