कंपनीत नाईट ड्युटीसाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना चाकण परिसरात घडली आहे. आरोपीने पीडितेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. चाकणजवळील मेदनकरवाडी परिसरात १३ मे रोजी रात्रपाळीच्या ड्युटीसाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती.
प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून तो गुन्हा करून घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
चाकण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, पीडित तरुणी मुठकेवाडी परिसरातील एका व्यापारी संकुलातून जात होती आणि रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी तिला खंडोबा मंदिरापर्यंत नेऊन निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने प्रतिकार केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला.आरोपीने पळ काढल्यानंतर महिलेने एक कामगार महिला आणि पुरुष यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. महिलेला तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
पीडितेला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिला धक्का बसला आहे.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार म्हणाले, 'आरोपींना पकडण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशनचे टेक्निकल अॅनालिसिस वापरून आम्ही काही तासांतच आरोपीला अटक केली. मेदनकरवाडी येथील बस पिकअप पॉईंटवरून आरोपींनी पीडितेचा पाठलाग केला. ही घटना व्यापारी संकुलाच्या मागे घडली.
काय घडलं होतं -
पीडित तरूणी नाइट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. एका पॉईंट पर्यत त्यांना पायी जावं लागतं, त्या ठिकाणी पिक अप पॉईंटपर्यंत जात असताना आरोपीने पाठलाग केला, एका ठिकाणी त्याने मागून येऊन तोंड दाबलं, त्यानंतर गळा दाबत तिला एका कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला.
आरोपी अविवाहित पीडितेला ओळखतही नव्हता -
आरोपी अविवाहित असून, तो एका कंपनीत कामाला आहे. घटना घडली तेव्हा तो दारू प्यायलेला होता. ‘रस्त्याने जाताना महिला दिसली आणि मी तिला ओढत बाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला,’ अशी कबुली आरोपीने दिली आहे. त्या दोघांचा यापूर्वीचा कोणताही परिचय नव्हता. दोघे एकमेकांना ओळखत नव्हते, दोघांच्या कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत.
संबंधित बातम्या