मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Murder: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेला संपवलं! नंतर ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, कोल्हापुरातील घटना

Kolhapur Murder: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेला संपवलं! नंतर ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, कोल्हापुरातील घटना

Dec 30, 2023 10:08 AM IST

Kolhapur Ajara Murder : कोल्हापूर येथील आजरा येथे एका महिलेच्या हत्येला वाचा फुटली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने हे हत्याकांड पोलिसांनी उघड केले आहे.

kolhapur murder
kolhapur murder

Kolhapur Ajara Murder : कोल्हापूर येथील आजरा येथे एका महिलेच्या हत्येला वाचा फुटली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने हे हत्याकांड पोलिसांनी उघड केले आहे. शरीर संबंधाला विरोध केल्याने एका महिलेचा खून करण्यात आला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह ऊसाच्या फडात टाकून फेकून देऊन आग लावली. या नंतर आरोपी स्वत: पोलिसांसोबत तपास कार्यात सहभागी झाला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला शिताफीने बेड्या ठोकल्या. ही घटना आजरा तालुक्यातिल भादवण येथे गुरुवारी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Pune Expressway : न्यू ईयरलाही पुणे - मुंबई एक्सप्रेस वे होणार जॅम; महामार्ग पोलिसांकडून पुन्हा आवाहन

आशाताई मारुती खुळे ( वय ४२ ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या विधवा आहेत. योगेश पांडुरंग पाटील ( वय ४६, रा. भादवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आजरा पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशाताई खुळे या विधवा आहेत. त्या गुरुवारी शेतात काम करत असतांना त्याने त्यांच्याशी जबरदस्ती करत शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला आशाताई यांनी विरोध केला.

PM Modi : पंतप्रधान मोदी यांचा आज अयोध्या दौरा; २ अमृत भारत, ६ वंदे भारत एक्सप्रेससह ‘या’ प्रकल्पांचे लोकार्पण

दरम्यान, रागाच्या भारत आरोपीने पाटील याने आशाताई यांचा गळा आवळून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भादवण ते भादवणवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात त्यांचा मृतदेह ओढत नेऊन योगेश यांनी उसंच पहाड पेटवून दिला. पीडित आशाताई या आईसोबत भादवण येथे राहतात तर आरोपी योगेश हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत.

दरम्यान, आग लागल्यानंतर आरोपी पाटील हा ती विझवण्यासाठी पुढे होता. त्याने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यास देखील पोलिसांना मदत केली. यामुळे आरोपीवर कुणाला संशय आला नाही. मात्र पोलिस दलात असलेले गावातीलच समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्ही तपासले. यात आरोपीचे बिंग फुटले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग