Hair Dryer Blast in Karnataka's Bagalkot: कर्नाटकातील बागलकोटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. कुरिअरने ऑर्डर मागिवलेल्या हेअर ड्रायरची तपासणी अचानक स्फोट झाल्याने एका महिलेला आपले दोन्ही हात गमवावे लागले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून या घटनेमागील सत्य तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना बुधवारी (२० नोव्हेंबर २०२४) घडली.
बसम्मा यारानल असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी एक व्यक्ती कुरिअर घेऊन बसम्मा यांच्या घरी आला. मात्र, त्या घरात नसल्याने त्यांनी घरी नसल्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या राजेश्वरी यांना डिलिव्हरी घेण्यास सांगितली. त्यानंतर राजेश्वरी यांनी कुरिअर बॉक्समध्ये हेअर ड्रायर असल्याची पुष्टी केली, जे डीटीडीसी कुरिअर सेवेद्वारे आले आणि त्यात ‘चायनीज मेड’ केमेई ब्रँडचे होते.
दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर बसम्मा यांनी राजेश्वरीकडून आपले पार्सल घेतले. त्यावेळी राजेश्वरी यांनी बसम्मा यांना हेअर ड्रायर एकदा तपासून घेण्याचा सल्ला दिला. पण बसम्मा यांनी हेअर ड्रायर चालू करताच मोठा स्फोट झाला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटात बसम्मा यांच्या हाताची सर्व बोटे गेल्याची माहिती आहे. या घटनेमुळे बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणांचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या निकषांची योग्य तपासणी केली जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बसम्मा यारनाल या माजी सैनिक पापन्ना यारनाल यांच्या विधवा आहेत, ज्यांचा २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या पतीचा मृत्यू आणि सध्याच्या घटनेभोवतीच्या परिस्थितीमुळे या प्रकरणात गूढतेचा थर वाढला आहे. हा अपघात होता की घातपात याचा पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हेअर ड्रायर वापरताना त्यांची योग्य ती सेटींग्ज करता आली नाही, त्यामुळे स्फोट झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, हे पार्सल कोणी मागवले आणि पैसे कसे दिले गेले? याचा तपास आता अधिकारी करीत आहेत.