मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Murder : सिगरेट ओढताना महिलेकडे पाहिल्याने भोसकले! आरोपी महिलेसह दोघांना अटक

Nagpur Murder : सिगरेट ओढताना महिलेकडे पाहिल्याने भोसकले! आरोपी महिलेसह दोघांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 09, 2024 09:06 AM IST

Nagpur Murder : नागपुरात पानटपरीवर सिगरेट पीत असणाऱ्या महिलेकडे पाहिल्याने तिने एका व्यक्तीचा खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सिगरेट ओढतांना महिलेकडे पहिल्याने भोसकले! आरोपी महिलेसह दोघांना अटक
सिगरेट ओढतांना महिलेकडे पहिल्याने भोसकले! आरोपी महिलेसह दोघांना अटक

Nagpur Murder : महाराष्ट्रातील नागपुरात एका २४ वर्षीय महिलेने पानटपरीवर सिगारेट ओढत असताना तिच्या कडे एक टक पाहत असणाऱ्या व्यक्तीचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather update : राज्यावर अस्मानी संकट! विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; असे असेल हवामान

रंजीत राठोड (वय २४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जयश्री पंधारे असे आरोपी महिलेचे नाव आहे. रणजीत राठोड हा शनिवारी पान टपरीवर सिगरेट पिण्यासाठी गेला होता. यावेळी जयश्री पंधारे ही महिला तिच्या मित्रांसोबत सिगारेट ओढण्यासाठी तेथे आली आणि धूम्रपान करू लागली.

नागपुरातील मानेवाडा रस्ता येथे झालेल्या या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड जेव्हा जयश्री पांधरेकडे एकटक पाहत होता तेव्हा तिने त्याला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर राठोडने आपला मोबाईल काढून जयश्रीचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली, त्यात ती सिगारेट ओढत असताना शिवीगाळ करत होती. यामुळे राठोडनेही शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. जयश्री पांधरे ही तिची मैत्रिण सविता सायरे हिच्यासोबत उभी होती.

Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोकं...', पंतप्रधान मोदींचं ठाकरेंच्या वर्मावर बोट

दरम्यान हा वाद टोकाला गेल्याने जयश्रीने तिचे मित्र आकाश राऊत आणि जीतू जाधव यांना बोलावले. दरम्यान, वाद संपवून दोघेही पाणटपरीवरुण निघून गेले होते. तर रणजीत राठोड हा महालक्ष्मी नगर येथे पोहोचला होता. या ठिकाणी तो बिअर पीत असताना, आरोपी त्याच्या मागे गेले आणि तेथे त्याच्याशी वाद घालू लागले. हा वाद एवढा वाढला की रागाच्या भरात महिला आणि टीच्या दोन साथीदारांनी रणजित राठोडवर चाकूने हल्ला करून त्याला भोसकले. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. जयश्री पांधरे हिने रणजित राठोडवर चाकूने वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

रणजित राठोडचा खून केल्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी जयश्री, सविता आणि आकाशला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास देशमाने यांनी सांगितले. या प्रकरणात राठोडच्या फोनमधील फुटेज आणि सीसीटीव्हीतून मिळालेला व्हिडिओ हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग