सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना

सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना

Dec 13, 2024 03:17 PM IST

Bhiwandi Murder : भिवंडीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासू सुनेच्या वादात आईने पोटच्या मुलाची हत्या केली आहे.

सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना
सासू सोबत झालेल्या वादात पोटच्या मुलाची आईने केली हत्या! ठाण्यातील खळबळजनक घटना

Bhiwandi Murder: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येते एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सासू सुनेच्या वादातून तसेच सासू मुलावर जास्त हक्क सांगत असल्याच्या रागातून आईने आपल्याच मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी निष्ठुर आईला अटक केली असून तिने खुनाची कबुली दिली आहे.

आरोपी महिला ही २३ वर्षांची असून तिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. आरोपी महिला ही तिच्या पती व सासू. सासऱ्या सोबत भिवंडी येथील कासणे गावात राहायला आहे. त्यांना एक मुलगा आहे. आरोपी महिलेचे तिच्या पती सोबत पटत नव्हते. तसेच तिचा मुलगा देखील सतत राहत होता. यामुळे सासू मुलाची काळजी घेत असे. मात्र सासू मुलावर जास्त हक्क दाखवते, असा तिचा समज झाला आणि यातून तिने ही हत्या केली.

मंगळवारी आरोपी महिलेचे सासू सासरे मुलाला घेऊन टिटवाळा इथं मुलीच्या घरी जात होते. मात्र, सध्या थंडी असल्याने मुलगा आजारी असल्याने मुलाला बाहेर घेऊन जाऊ नका असं आरोपी सुनेने सासूला म्हटले. मात्र, यावरून सासू-सुनेमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद झाल्यावर देखील सासू व सासरे नातवाला घेऊन टिटवाळा येथे गेले. मात्र संध्याकाळी सर्व घरी परतल्यावर मुलगा आजारी पडला. यामुळे पुन्हा सासू-सुनेमध्ये जोरदार भांडण झालं. दरम्यान पटीने मंगळावारी सायंकाळी आपल्या पत्नीची समजूत काढली व यांनतर तो कामाला निघून गेला.

दरम्यान, मुलाचे वडील हे कलावरून दुसऱ्या दिवशी पहाटे कामावरून घरी आले व झोपी गेले. यावेळी पत्नीने नवऱ्याला उठवून मुलगा सापडत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलाच शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगा एक वर्षांचा असल्याने त्याच कुणी अपहरण केले का हा संशय देखील कुटुंबीयांना आला. मात्र, काही वेळाने घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या टाकीत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या घटनेचा तपास केल्यावर आईनेच मुलाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला अटक केल्यावर कारण विचारले. यावेळी सासू सुनेच्या वादातून तिने हे कृत्य केल्याचे कबूल केले. यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर