Andheri suicide case : मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील एस व्ही रोडवर असलेल्या मिलियनेअर हेरिटेज सोसायटीमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
विधी प्रमोद कुमार सिंग (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. डीएन नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या खोलीत एक चिठ्ठी आढळली असून तिने ट्यात नैराश्यातून हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले.
विधी ही गेल्या काही वर्षांपासून या इमारतीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती, तर तिचे कुटुंबीय ठाण्यात शेजारी राहतात. ती विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती, दरम्यान, या घटनेत आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. इमारतीच्या वॉचमनने सर्वात आधी तिचा मृतदेह काहलि पडलेला असलेल्या पहिला. यानंतर त्याने याची माहिती सोसायटीच्या इतर सदस्यांना दिली. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तिच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या