ठाणे जिल्ह्यातील एका ३० वर्षीय तरुणाच्या गुप्तांगावर महिलेने लोखंडी शस्त्राने वार करत दुखापत केली आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सत्यनारायण राचा (वय ३० ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने भिवंडी परिसरातील एका २६ वर्षीय तरुणीला तिच्या राहत्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन केले होते.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि महिला एकमेकांना ओळखत होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राचा याने तिच्या घरी जाऊन लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता.
महिलेने स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वयंपाकघरात धाव घेतली आणि धातूचा स्पॅटुला (चमचा) उचलला. तिने राचावर हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग जखमी केले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
गंभीर जखमी झालेल्या राचाला वैद्यकीय मदतीसाठी घराबाहेर काढण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत (बीएनएस) महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ आणि अतिक्रमण या कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप रुग्णालयात असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या महिन्यात सारण जिल्ह्यात एका व्यक्तीने लग्नास नकार दिल्याने महिलेने हल्ला करून त्याचे गुप्तांग कापून टाकले होते. महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडून रक्ताने माखलेला चाकू जप्त करण्यात आला.
चौकशीनंतर आरोपीने सांगितले की, तिचे आणि पीडितेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते, परंतु त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याने प्रस्ताव नाकारल्याने वाद झाल्यानंतर तिने त्याच्यावर हल्ला केला. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला.