डिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लंपास; मुंबईतील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लंपास; मुंबईतील धक्कादायक घटना

डिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लंपास; मुंबईतील धक्कादायक घटना

Dec 01, 2024 01:44 PM IST

woman digital arrest : मुंबईतील एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या महिलेला डिजिटलअरेस्ट करत तिला व्हिडिओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले. यानंतर तिच्या खात्यातून १.७ लाख रुपये लंपास करण्यात आले.

डिजीटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लांपास; मुंबईतील धक्कादायक घटना
डिजीटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लांपास; मुंबईतील धक्कादायक घटना

woman digital arrest : सायबर गुन्हेगार आजकाल 'डिजिटल अरेस्ट'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना लक्ष करून त्यांची फसवणूक करत आहेत. मुंबईत अशा अनेक घटना रोज उघडकीस येत आहेत. आशीच आणखी एक घटना उघडकीस आली असून यात एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट करत टीची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांनी तिच्या खात्यातून १.७ लाख रुपयांची फसवणूक केली. शिवाय तिला व्हिडिओ कॉल करत तिला नग्न होण्यास भाग पाडले.  मिळालेल्या माहितीनुसार, बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आरोपींनी व्हिडिओ कॉलवर महिलेचे कपडे काढण्यात आले.

महिलेच्या तक्रारीवरून दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा अंधेरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २० नोव्हेंबर दरम्यान या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.  सायबर चोरट्यांनी दिल्ली पोलिस अधिकारी म्हणून माहीला फोन करत तिची फसवणूक केली.  

सायबर गुंडांनी माहीलेला फोन करून सांगितले की, महिलेविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. त्यानंतर आरोपीने महिलेला हॉटेलची खोली बुक करण्यास सांगितले. यानंतर त्याने एका लिंकवर क्लिक करून तिच्या  खात्यातून १ लाख ७० हजार रुपये लंपास केले.  यानंतर चोरट्यांनी बॉडी व्हेरीफीकेशनच्या नावाखाली व्हिडिओ कॉल करत या महिलेला कपडे काढण्यास सांगितले. 

गुजरातमध्ये देखील एक दिवस आधी असेच एक प्रकरण समोर आले होते.  येथे एका वृद्ध व्यक्तीला अटक करून त्याच्या  खात्यातून ६१ लाख रुपये काढण्यात आले. सुरत क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या वृद्ध व्यक्तीला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून त्याच्या  नावाने मुंबईहून चीनला पाठवलेले पार्सल सापडले असल्याची बतावणी करत त्यात ड्रग्ज असल्याचे सांगण्यात आले. यानंतर या वृद्ध व्यक्तीला १५  दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते.

हा व्यक्ति  शेअर बाजारात गुंतवणूक करायचा. त्यांना फोन आला आणि त्यांच्या नावे असलेल्या बुक कुरिअरमध्ये ४०० ग्रॅम एमडी सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात त्याच्या कुटुंबीयांनाही अडकवले जाऊ शकते, अशी धमकी देण्यात आली होती. तसेक त्यांना अटकही होऊ शकते, असे सांगत या व्यक्तीला  १५ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. व त्याच्या खत्यातून मोठी रक्कम लंपास करण्यात आली होती.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर