Kurla crime news : मेट्रोच्या साइटवर सापडलेल्या सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, मुंबईतील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kurla crime news : मेट्रोच्या साइटवर सापडलेल्या सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, मुंबईतील घटना

Kurla crime news : मेट्रोच्या साइटवर सापडलेल्या सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, मुंबईतील घटना

Updated Nov 20, 2023 10:28 AM IST

Mumbai Crime News: मुंबईत कुर्ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मेट्रोच्या बांधकामादरम्यान, एका पुला खाली सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे.

Mumbai Crime News
Mumbai Crime News

Mumbai kurla Crime Newsआर्थिक राजधानी मुंबईत गुन्हेगारीच्या घटना या वाढीस लागल्या आहेत. कुर्ला येथून एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. कुर्ला येथे मेट्रोच्या काम सुरू असतांना पुलाखाली एक बंद सुटकेस रविरात्री एकच्या सुमारास सापडली असून यात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. तिचा मृतदेह हा राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! काही ठिकाणी पासवाची शक्यता; असे असेल हवामान

मुंबईत कुर्ला येथे रविवारी १२.३० ते १ च्या दरम्यान, कुर्ला येथे सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो पुलाच्या बांधकामाजवळील पुलाखाली एक सुटकेस सापडली होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, पोलिस घटनास्थळी आल्यावर त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा करून ही सुटकेस उघडली. यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. दरम्यान, या महिलेचा खून कुणी केला, ही महिला कोण? ही सुटकेस येथे कुणी आणून टाकली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. या महिलेचा मृतदेह हा पोलिसांनी राजावाडी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या महिलेची ओळख पटली नसल्याने पोलीसांपुढे तपासात आव्हान आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज पुण्यात धडाडणार; खराडीतील सभेसाठी वाहतुकीत मोठा बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुटकेसमध्ये मृतदेह सापडलेल्या महिलेचे वय हे अंदाजे ३५ ते ४० असून या महिलेच्या अंगावर टीशर्ट आणि नाइट पॅन्ट परिधान केलेली आहे. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

सध्या मुंबई पोलिस बेपत्ता असलेल्या महिलांची कुणी तक्रार दिली आहे का याचा तपास करत आहेत. तसेच घटणस्थळांचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासल्या जात आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर