मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आईला चिठ्ठी लिहून प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपायानं संपवलं जीवन, नागपूर प्रशिक्षण केंद्रात खळबळ

आईला चिठ्ठी लिहून प्रशिक्षणार्थी महिला पोलीस शिपायानं संपवलं जीवन, नागपूर प्रशिक्षण केंद्रात खळबळ

Jul 10, 2024 05:14 PM IST

Nagpur News : नागपूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. यामुळे प्रशिक्षण केंद्रात खळबळ माजली आहे.

महिला पोलीस शिपायाने संपवलं जीवन
महिला पोलीस शिपायाने संपवलं जीवन

नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात (Nagpur Police Training Center) प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात लिहिले आहे की, आपण आत्महत्या केल्याचे आईला सांगू नका. या घटनेमुळे नागपुरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात खळबळ उडालेली आहे.

प्रतीक्षा भोसले असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायाचे नाव आहे. ती नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती. प्रतीक्षा मूळची पुणे जिल्ह्यातील होती तसेच ती विवाहित असल्याचे समजते. प्रतीक्षाने प्रशिक्षण केंद्राच्या वसतीगृहात असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या लोखंडी पायऱ्यांना गळफास घेत आत्महत्या केली. यावर्षी फेब्रुवारीपासून ती नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत होती.

ट्रेंडिंग न्यूज

प्रतीक्षा गेल्या काही दिवसापासून नैराश्येत असल्याचे म्हटले जात आहे. या कौटुंबिक नैराश्यातूनच तिने आपले जीवन संपवले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.महिला शिपायानेआत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की,'मी आत्महत्या केल्याचं माझ्या आईला कळू देऊ नका' .या चिठ्ठीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. प्रतीक्षाने ८ जूलै रोजी आत्महत्या केली होती. मात्र ही घटना मंगळवारी (९ जुलै) रोजी सकाळी उघडकीस आली.

पोटच्या मुलीची हत्या करून महिलेनं स्वत:चंही आयुष्य संपवलं!

पालघर येथील डहाणूमध्ये घरगुती वादातून एका महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना डहाणू परिसरातील सिसणे गावात सोमवारी (८ जुलै २०२४) घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मृत महिला आपल्या कुटुंबासह कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. तर, तिचा पती मच्छीमार तो सतत कुटुंबापासून दूर असायचा. गेल्या अनेक दिवसानंतर रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. आपल्याला सोबत नेले नाही म्हणून महिलेला राग अनावर झाला. तिने कशाचाही विचार न करता पोटच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घराच्या छताला गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केली.

WhatsApp channel
विभाग