खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज…; अंगणवाडीसाठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज…; अंगणवाडीसाठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी!

खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज…; अंगणवाडीसाठी वाटली जाणारी खिचडी खाऊन दाखवावी!

Published Sep 18, 2024 06:16 PM IST

Poshan Aahar : महिला सरकारला प्रश्न विचारते की, लहान मुले देशाची संपत्ती आहे, मात्र असला निकृष्ठ पोषण आहार घेऊन त्यांचे वजन वाढेल का, त्याचा विकास होईल का? माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे की, त्यांनी ही खिचडी खाऊन दाखवावी.

खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज
खेडूत महिलेचं एकनाथ शिंदेंना चॅलेंज

Poshan Aahar : सरकारकडून गर्भवती महिला, स्तनदा माता व लहान मुलांना अंगणवाडी मार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. पोषण आहाराच्या धान्यात आळ्या, झुरळे, पाली निघण्याचे प्रकार आता नवीन राहिले नसून याला आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. आता लातूर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामधील नागेवाडी गावात निकृष्टी दर्जाचा पोषण आहार वाटला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असून एका महिलेने तर या धान्यापासून बनवलेले खिचडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खाऊन दाखवावी, असे थेट चँलेंज दिले आहे.

नागेवाडी गावात पोषण आहाराबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण केले जात होते. यावेळी अधिकाऱ्याला तेथील महिलांनी पुरवल्या जाणाऱ्या धान्यावरून जाब विचारला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात दिसते की, अंगणवाडीत पुरवला जाणाऱ्या पोषण आहारावरून एक महिला चांगलीच आक्रमक झाली आहे. जनावरं सुद्धा खाणार नाहीत असा निकृष्ट दर्जाचा आहार राज्य सरकारकडून अंगणवाडी मधील बालकांना व गरोदर महिलांना पौष्टिक आहार म्हणून दिला जातोय, अशा तक्रारी या महिला करत आहेत. महिला पोषण आहाराचे पाकिट फोडून त्यातील जाळ्या व किडे दाखवते. या धान्याला वासही येत असल्याचे म्हणते. महिला सरकारला प्रश्न विचारते की, लहान मुले देशाची संपत्ती आहे, मात्र असला निकृष्ठ पोषण आहार घेऊन त्यांचे वजन वाढेल का, त्याचा विकास होईल का? असली खिचडी सरकार तर खाईल का. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान आहे की, त्यांनी ही खिचडी खाऊन दाखवावी.

जनावरंही खात नाहीत धान्य -

महिला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असल्याचे दिसते. ती म्हणते की, माझ्याकडे ही पाकिटे भरून पडली आहेत. मी अनेकांना फोन करून ती घेऊन जाण्यास सांगते मात्र कोणीही नेत नाहीत. हे धान्य जनावरेही खात नसल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यातच या धान्यांच्या पाकिटांमध्ये पाली व झुरळे सापडणे, जाळ्या होणे तर सामान्य झाल्याचा तक्रारी उपस्थित नागरिकांनी केल्या आहेत.

पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी -

राज्य सरकारकडून अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. त्याबरोबरच गरोदर माता व स्तनदा मातांसाठी देखील पोषण आहार योजना राबवली जात आहे. मात्र या योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला नसून तो निकृष्ट दर्जाचा माल असल्याच्या तक्रारी या आधीही अनेकवेळा करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून यावर पुरवठादारा विरोधात काहीच कारवाई झाली नसल्याने निकृष्ट दर्जाचा माल पुरवठा करणे सुरूच आहे. यापूर्वी लातूरमधीलच रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथे पोषण आहारात आळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर