Sambhaji Nagar : संभाजी नगर येथील वाळूज उद्योग नगरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीला मैत्रिणीबरोबर चाळे करतांना रंगेहात पकडले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मैत्रिणीला घरच्या गेटला बांधून चोप दिला. ऐवढेच नाही तर तिला दिवसभर उन्हात बांधून ठेवले. हा प्रकार पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी संतापलेल्या पत्नीच्या तावडीतून तरुणीची सुटका केली.
पतीचे एका दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. या कारणावरून त्याने त्याच्या पत्नीशी रोज भांडण व्हायचे. या भांडणातून त्याने पत्नी आणि मुलाला घरातून हाकलून दिले होते. विवाहितेचा पती हा वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव येथे राहतो. तो उद्योगनगरीतील एका कंपनीत सुपरवायझरचे काम करतो. त्याचे काही दिवसांपुर्वी एका दुसऱ्या महिलेसोबत सूत जुळले होते. दरम्यान, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्याने तीन महिन्यांपुर्वी पत्नी व दोन मुलांना घराबाहेर काढले. यानंतर तो त्याच्या मैत्रिणीला घरी आणून मजा मारत होता.
दरम्यान, ही बाब पत्नीला समजली. यामुळे पतीला अद्दल घडवण्याचे पत्नीने ठरवले. पत्नी ही दोन दिवसांपूर्वी रांजणगाव येथे तिच्या भावाला भेटली. तिने सर्व प्रकार भावाला सांगितला. दरम्यान, बुधवारी ती भावाला सोबत घेऊन सकाळीच घरी आली. यावेळी पती व त्याच्या मैत्रिणीचे घरात चाळे सुरू होते. दोघांना नको त्या अवस्थेत पाहून पत्नी चांगलीच संतापली. तिने व तिच्या भावाने पती व त्याच्या मैत्रिणीला चांगलाच चोप दिला. महिलेने पतीच्या मैत्रिणीचे हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. भर उन्हात पत्नीने पतीच्या मैत्रिणीला बांधून तिला मारहाण केली.
दरम्यान, या घटनेची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व गेटला बांधून ठेवलेल्या तरुणीची सुटका केली. यानंतर तिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पती, पत्नी, व त्याच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या