मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral News: नवऱ्याला सोडेल, पण मशेरी लावायची सोडणार नाही; नवविवाहित दाम्पत्याचे भांडण पोलिसांपर्यंत

Viral News: नवऱ्याला सोडेल, पण मशेरी लावायची सोडणार नाही; नवविवाहित दाम्पत्याचे भांडण पोलिसांपर्यंत

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 07:41 PM IST

Agra husband and wife Dispute: मशेरी लावण्यावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.

Viral News
Viral News

Agra Viral News: आग्रा येथील नवविवाहित दाम्पत्यामधील भांडणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पत्नीला मशेरी लावायचे व्यसन आहे, ती दिवसांत चार- पाच वेळा मशेरी लावते, तिला मशेरी लावण्यापासून रोखल्यामुळे ती माहेरी निघून गेली, असा आरोप संबंधित महिलेच्या पतीने केला आहे. हा वाद कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचला असून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आग्राच्या मंटोला येथील रहिवासी असलेल्या तरुणाचे आठ महिन्यांपूर्वी फतेहपुस्सीकरी येथील एका तरुणीशी लग्न झाले. मात्र, त्याची पत्नी गेल्या दोन महिन्यापासून माहेरी आहे. तरुणाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या पत्नीला मशेरी लावायचे व्यसन आहे. यामुळे दाम्पत्यामध्ये वाद पेटला आहे. हा वाद कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचला असता पतीने आपली बाजू मांडत सांगितले की, त्याच्या पत्नीला मशेरी लावायचे व्यसन आहे. ती दिवसांत चार- पाच वेळा मशेरी लावते. तिला मशेरी लावण्यापासून अडवल्यामुळे ती रागावली आणि माहेरी निघून गेली. यानंतर पत्नीने स्पष्ट सांगितले की, एकवेळ ती नवऱ्याला सोडेल, पण मशेरी लावायची सोडणार नाही. नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नसेल, तो तिला सोडून जाऊ शकतो. समुपदेशकाने या दाम्पत्याला तिसरी तारीख दिली आहे.

पत्नी राजकारणात सक्रिय असल्याचे पतीला खटकले, मग...

आपली पत्नी राजकारणात सक्रीय असल्याचे पतीला खटकले. पत्नीने राजकारण सोडले नाहीतर तो तिच्यासोबत घटस्फोट घेईल, अशीही त्याने धमकी दिली आहे. या प्रकरणातील व्यक्तीचे आठ वर्षांपूर्वी सिकंदरा भागात लग्न झाले. काही वर्षांपूर्वी या महिलेने एका राजकीय पक्षात प्रवेश केला. जाहीर सभांना जाऊ लागले. तसेच तिचे कार्यकर्त्यांसह होर्डिंग्ज लावले जाऊ लागले, जे तिच्या पतीला आवडले नाही. त्यांच्यात वाद होऊ लागला. समुपदेशक अमित गौर यांनी सांगितले की, या प्रकरणात पत्नीचे राजकारणात सक्रिय असणे पतीला आवडत नाही. यावर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. पत्नीने सांगितले की, मला राजकारणात करिअर करायचे आहे. नवऱ्याला तिला गृहिणी म्हणून ठेवायचे आहे. दोघेही जिद्दी आहेत. त्यांना पुढच्या तारखेला बोलावले आहे.

WhatsApp channel