Microsoft buys second plot in Pune : पुण्यातील जमिनींचा भाव गगनाला भिडला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यात एक एकर जमीनिसाठी तब्बल २७ कोटी मोजले आहे. मायक्रोसॉफ्टने एकाच आठवड्यात पुण्यातील हिंजवडी येथे दोन वेगवेगळे भूखंड खरेदी केले आहे. गेल्या आठवड्यांतच कंपनीने याच भागातील आणखी १६.४ एकर भूखंड ४५३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट भारतात आणखी विस्तार करणार ही स्पष्ट झालं आहे.
मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडी येथील माण भागात ही जमिन खरेदी केली आहे. राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये मायक्रोसॉफ्टने ही जमीन व्हिवा हायवेज कंपनीकडून खरेदी केली आहे. हा व्यवहार ४५३ कोटी रुपयांना झाला आहे. या व्यवहारापोटी मायक्रोसॉफ्टने २७.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने ऑगस्ट महिन्यात हिंजवडीत १६.४ एकर जमीन खरेदी केली होती. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत या साठी ५२० कोटी रुपयांना व्यवहार करण्यात आला. यासाठी मायक्रोसॉफ्टने ३१.१८ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क व ३० हजार रुपयांचे नोंदणी शुल्क भरले.
२६ हजार ४५० चौरस मीटर भूखंडासाठी २७ कोटी १८ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून नाशिकच्या व्हिवा हायवे लिमिटेड या कंपनीकडून खरेदी करण्यात आल्याचे करार नोंदणीच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. राजेंद्र चिंदुलाल बुराड, महेंद्र भोपाळसिंग मेहता आणि अनुप सुभाषचंद्र कटारिया हे या कंपनीचे संचालक आहेत.
ऑगस्ट महिन्यात कंपनीने हिंजवडीतील सुमारे १६.४ एकर जमीन ५२० कोटी रुपयांना घेतली होती, ज्याची नोंदणी ६ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. २०२२ मध्ये कंपनीने पिंपरी-चिंचवडमधील २५ एकर जमीन ३२८ कोटी रुपयांना विकत घेतली होती.
पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे यापूर्वीच मोठ्या सुविधा उभारण्यात आल्या असून, डेटा सेंटरचे कामकाज बळकट करण्याच्या कंपनीच्या व्यापक धोरणाचा हा एक भाग असल्याचे दिसून येत आहे. या भूखंडांच्या विकासानंतर रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याने राज्यातील तरुणांना याचा फायदा होणार आहे.